
PM Modi on Khaleda Zia Health
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान Khaleda Zia व्हेंटिलेटरवर; प्रकृती अत्यंत चिंताजनक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, बांगलादेशच्या विकासासाठी अनेक वर्षांपासून योगदान देणाऱ्या बेगम खालिदा झिया यांची प्रकृती जाणून चिंता वाटत आहे. आम्ही त्यांच्या पुन्हा लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
खालिदा झिया यांच्या पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, खालिदा झिया यांना २३ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या आजारांमुळे त्यांना छातीत संसर्ग झाला होता. यामुळे त्यांच्या हृदयावर आणि फुफ्फुसावर परिणाम झाले आहे. सध्या त्यांना कोरोनरी केअर युनिटमध्ये हलवण्यात आले असून त्यांच्यावर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ञ उपचार करत आहे.
त्यांना व्हेंटिलेटलवर ठेवण्यात आले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागर मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी खालिदा जिया यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी जनतेला खालिदा यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
खालिदा झिया आणि शेख हसीना या दोन्ही बांगलादेशच्या महिला पंतप्रधान असून दोन्ही एकमेकांच्या विरोधक आहे. परंतु दोन्ही महिला नेत्यांनी १९८० मध्ये बांगलादेश लष्करी राजवटीच्या विरोधात एकत्रितपणे लढा दिला होता. मात्र १९९० मध्ये लोकाशीह स्थापन झाल्यानंतर १९९१ च्या निवडणुकीत खालिदा यांचा विजय झाला. तेव्हापासून दोन्ही महिला नेत्यांमध्ये अनेक वेळा खुर्चीसाठी चुरशीची लढत झाली. त्यावेळी त्यांच्या या लढाईला लोकांनी बेगमांची लढाई असे नाव दिले होते.
Deeply concerned to learn about the health of Begum Khaleda Zia, who has contributed to Bangladesh’s public life for many years. Our sincere prayers and best wishes for her speedy recovery. India stands ready to extend all possible support, in whatever way we can. — Narendra Modi (@narendramodi) December 1, 2025
Ans: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली असून भारताकडून सर्व मदत करण्याचे म्हटले आहे.
Ans: गेल्या अनेक वर्षांपासून खालिदा झिया किडनी, डायबेटिज, संधिताव, आणि डोळ्यांच्या समस्यांनी ग्रस्त आहेत.