Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Indonesia Visit : चीनची खैर नाही! भारत-इंडोनेशिया ब्रह्मोस करार अंतिम टप्प्यात; PM मोदींच्या दौऱ्यात करारावर शिक्कोमोर्तब?

PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात इंडोनेशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून यामध्ये भारत-इंडोनेशियात ब्रह्मोस खरेदीच्या अंतिम करारावर शिक्कोमोर्बत होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 05, 2026 | 01:25 PM
PM Modi Indonesia Visit

PM Modi Indonesia Visit

Follow Us
Follow Us:
  •  भारताकडून हे घातक शस्त्र खरेदी करणार इंडोनेशिया?
  • PM मोदींच्या दौऱ्यात कराराची शक्यता
  • चीनची झोप उडाली
PM Modi Indonesia Visit News in Marathi : नवी दिल्ली/जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा तीन देशीय परदेशी दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्यात सर्वाधिक लक्ष भारत आणि इंडोनेशियातील ब्रह्मोस करारावर आहे. हा करार अंतिम टप्प्यात असून पंतप्रधानांच्या दौऱ्यावर यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Pakistan Nuclear Threat : पाकिस्तानची दुहेरी खेळी! एकीकडे अणु युद्धाची धमकी; दुसरीकडे मुनीरचा भारतविरोधी मोठा डाव?

भारत-इंडोनेशियात ब्रह्मोस करारावर चर्चा

गेल्या काही वर्षापासून भारत-इंडोनेशियात ब्रह्मोस क्षेपणास्त्र करारावरुन चर्चा सुरु होती. मार्च २०२६ मध्ये भारतासोबत या क्षेपणास्त्र खरेदीसाठीच्या प्राथमिक कराराला अधिकृत मंजुरी देण्यात आली असून याच्या अतिरिक्त विस्तारासाठी पंतप्रधानांच्या येत्या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांनी संरक्षण उद्योग सहकार्य समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये क्षेपणास्त्र पुरवठ्यांसोबत तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त संशोधन आणि संरक्षण साखळी पुरवठा मजबूत करता येईल, असा उद्देश आहे. हा करार झाल्यास भारताच्या संरक्षण निर्यात धोरणाला आणि ‘मेक इन इंडिया’ ला मोठी चालना मिळेल.

हा करार इंडोनेशियासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात जात आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनचा वाढता प्रभाव आणि लष्करी हालचालींमुळे इंडोनेशिया सतर्क झाले आहेत. अशा परिस्थितीत ब्रह्मोससारख्या आधुनिक सुरपसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रामुळे इंडोनेशियाची सागरी संरक्षण क्षमता अधिक बळकट होईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

आतापर्यंत या देशांनी खरेदी केले ब्रह्मोस

फिलिपिन्स आणि व्हिएतनाम या देशांनी ब्रह्मोस प्रणाली स्वीकारली आहे. फिलिपिन्सने २०२२ मध्ये ३७४ दशलक्ष डॉलर्सचा करार केला होता. तर व्हिएतनामसोबत ६२९ दशलक्ष डॉलर्समध्ये ब्रह्मोस करार करण्यात आला. आता इंडोनेशियाने देखील २०० ते ३५० दशलक्ष डॉलर्सच्या करारावर शिक्कामोर्तब केले असून याच्या अतिरिक्त खरेदीची सध्या चर्चा सुरु आहे. याशिवाय मलेशिया आणि थायलंडनेही भारताच्या ब्रह्मोस प्रणालीत रस दाखवला आहे.

ब्रह्मोसची वैशिष्ट्ये

  • ब्रह्मोस हे जगातील वेगवान आणि अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते.
  • याच वेग ध्वनीच्या वेगापेक्षा सुमारे तीनपट जास्त असून अचूकपणे लक्ष्य गाठण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.
  • हे क्षेपणास्त्र विमानातून, जमिनीतून, समुद्रातून आणि लढाऊ विमानातूनही सहज डागता येते.
यामुळे सागरी सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या अनेक देशांकडून याची मागणी वाढत आहे. यामुळे पंतप्रधान मोदींचा आगामी इंडोनेशिया दौऱ्यात मोठ्या संरक्षण कराराच्या घोषणेची शक्यता आहे.

Khamenei Funeral : खामेनेईंना अंत्यदर्शनासाठी इराणी नागरिकांची गर्दी; ‘अमेरिका मुर्दाबाद’ आणि ‘Kill Trump चे नारे

Web Title: Pm modi indonesia visit brahmos deal final stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Indonesia
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार
1

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा
2

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा
3

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता
4

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.