Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Melodi: भारत-इटली संबंधांना मोदी- मेलोनींच्या मैत्रीचा नवा रंग; 8 व्या भेटीत होणार संरक्षण आणि ‘AI’ क्षेत्रातील ‘हे’ ऐतिहासिक करार

Strategic Modi Italy Visit: इटली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी १.३ लाख कोटी रुपयांच्या सामरिक भागीदारी आणि व्यापारावर चर्चा करतील, ज्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी चालना मिळेल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 20, 2026 | 09:29 AM
pm modi italy visit may 2026 giorgia meloni rome summit strategic trade defense deal

pm modi italy visit may 2026 giorgia meloni rome summit strategic trade defense deal

Follow Us
Close
Follow Us:
  • ऐतिहासिक द्विपक्षीय दौरा
  • १.३ लाख कोटींचा व्यापार अजेंडा
  • सामरिक भागीदारी आणि ‘G2-G3’ समीकरण

PM Modi Italy Visit May 2026 : जागतिक स्तरावर अमेरिका आणि चीन यांच्यात नव्या ‘G2’ समीकरणाची चर्चा रंगत असतानाच, भारताने युरोपच्या भूमीवर आपली सामरिक ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) त्यांच्या पाच देशांच्या महत्त्वपूर्ण युरोप दौऱ्याचा अंतिम आणि सर्वात हाय-प्रोफाइल टप्पा म्हणून इटलीची राजधानी रोममध्ये दाखल झाले आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्या विशेष निमंत्रणावरून आयोजित केलेला हा दौरा पंतप्रधान मोदींचा इटलीचा पहिला अधिकृत द्विपक्षीय दौरा आहे. मोदींचे विमान रोममध्ये उतरताच मेलोनी यांनी सोशल मीडियावर मोदींसोबतचा एक खास सेल्फी पोस्ट केला. “रोममध्ये स्वागत आहे, मित्रा,” असे कॅप्शन असलेल्या या सेल्फीने अवघ्या काही मिनिटांतच इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून, या दोन जागतिक नेत्यांमधील दृढ मैत्रीचे संकेत दिले आहेत.

मेलोनी-मोदींची ८ वी भेट आणि जागतिक महासत्तांचा दबाव

राजनैतिक वर्तुळात या भेटीकडे अत्यंत बारकाईने पाहिले जात आहे. २०२३ पासून पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील ही तब्बल आठवी भेट आहे. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था (अमेरिका आणि चीन) जेव्हा स्वतःचे वेगळे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा वेळी भारताचे युरोपमधील वाढते वजन अतिशय महत्त्वाचे ठरते. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोन्ही नेते ‘संयुक्त सामरिक कृती योजना २०२५-२९’ (Joint Strategic Action Plan) अंतर्गत झालेल्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेणार आहेत. याशिवाय जागतिक दहशतवाद आणि दहशतवादाला होणाऱ्या आर्थिक पुरवठ्याविरुद्ध (Terror Funding) दोन्ही देश एकत्र येऊन एक कडक आंतरराष्ट्रीय भूमिका घेणार आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International HR Day: फक्त ‘रंगोळी’ आणि ‘फन अ‍ॅक्टिव्हिटी’ नव्हे, तर कंपनीचा खरा कणा असलेल्या एचआर टीमचा पडद्यामागचा संघर्ष

१.३ लाख कोटींचा व्यापार आणि २०२९ चे महा-लक्ष्य

इटली हा सध्या युरोपियन युनियनमध्ये (EU) भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार २०२५ पर्यंत अंदाजे १.३ लाख कोटी रुपयांवर (१४.२५ अब्ज डॉलर) पोहोचण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. मात्र, दोन्ही नेत्यांचे उद्दिष्ट एवढ्यावरच मर्यादित नाही. २०२९ पर्यंत हा व्यापार २० अब्ज डॉलरच्या पार नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य या बैठकीत निश्चित केले जाणार आहे. इटालियन कंपन्यांनी आतापर्यंत भारतात ३.६६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, भारतीय ऑटोमोबाईल दिग्गज ‘टाटा मोटर्स’ने इटलीच्या ‘इव्हेको ग्रुप’चे (Iveco Group) केलेले यशस्वी अधिग्रहण हे भारतीय कंपन्यांची युरोपमधील वाढती ताकद अधोरेखित करते.

Prime Minister Narendra Modi tweets, “Upon landing in Rome, had the opportunity to meet Prime Minister Meloni over dinner followed by a visit to the iconic Colosseum. We exchanged perspectives on a wide range of subjects. Looking forward to our talks today, where we will continue… pic.twitter.com/JOuCS3EQaK — IANS (@ians_india) May 20, 2026

credit – social media and Twitter

संरक्षण आणि हाय-टेक तंत्रज्ञानाचा नवा रोख

या दौऱ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संरक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य. भारत आणि इटली आता केवळ शस्त्र खरेदी-विक्रीपुरते मर्यादित न राहता, लष्करी उपकरणांचे भारतातच सह-विकास आणि सह-उत्पादन (Co-development and Co-production) करण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वीच इटलीचे संरक्षण मंत्री गुइडो क्रोसेटो यांनी भारताचा दौरा करून या संरक्षण कराराची मजबूत पायाभरणी केली होती. याशिवाय, ‘सहकार्य कार्यक्रम २०२५-२७’ अंतर्गत क्वांटम कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर्स आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांवर दोन्ही देशांचे शास्त्रज्ञ एकत्र काम करणार आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Bee Day : धक्कादायक वास्तव! मधमाश्या संपल्या तर अवघ्या 4 वर्षांत माणूसही संपणार? पाहा शास्त्रज्ञांचा इशारा

इटलीतील ‘मिनी इंडिया’ आणि विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

इटलीमध्ये सध्या जवळपास पावणेदोन लाख ते अडीच लाख भारतीय नागरिक राहतात, जो युरोपियन युनियनमधील सर्वात मोठा भारतीय डायस्पोरा मानला जातो. भारत-इटली दरम्यान झालेल्या ‘स्थलांतर आणि गतिशीलता करारामुळे’ (Migration and Mobility Agreement) भारतीय व्यावसायिक, कामगार आणि विद्यार्थ्यांसाठी इटलीचे दरवाजे अधिक सुलभ झाले आहेत. सध्या ५,१०० हून अधिक भारतीय विद्यार्थी इटलीतील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. मोदी आपल्या या दौऱ्यात इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेणार असून, रोममधील प्रमुख डच आणि इटालियन उद्योगपतींशी संवाद साधतील. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) मुख्यालयाला भेट देऊन जागतिक अन्न सुरक्षेवर भारताची भूमिका मांडणार आहेत.

Web Title: Pm modi italy visit may 2026 giorgia meloni rome summit strategic trade defense deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • Italy
  • PM Narendra Modi
  • World news

संबंधित बातम्या

PM Modi Italy Visit : ‘स्वागत आहे, माझ्या मित्रा’ , PM मोदी इटलीत दाखल; जॉर्जिया मेलोनी यांनी शेअर केलेला सेल्फी क्षणात व्हायरल
1

PM Modi Italy Visit : ‘स्वागत आहे, माझ्या मित्रा’ , PM मोदी इटलीत दाखल; जॉर्जिया मेलोनी यांनी शेअर केलेला सेल्फी क्षणात व्हायरल

PM Modi Norway Visit : नॉर्वेमध्ये पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावरुन PM मोदींनी काढला पळ? VIDEO व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ
2

PM Modi Norway Visit : नॉर्वेमध्ये पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावरुन PM मोदींनी काढला पळ? VIDEO व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ

“महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले!” रायबरेली दौऱ्यावर राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘या’ मुद्द्यांवरून घेरले
3

“महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले!” रायबरेली दौऱ्यावर राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘या’ मुद्द्यांवरून घेरले

World Shortest Wars: ३८ मिनिटांत युद्ध संपले? जगाच्या इतिहासातील ५ अशा लढाया ज्यांचा कालावधी ऐकून व्हाल थक्क!
4

World Shortest Wars: ३८ मिनिटांत युद्ध संपले? जगाच्या इतिहासातील ५ अशा लढाया ज्यांचा कालावधी ऐकून व्हाल थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.