PM Modi met the leaders at SCO Summit but kept distance from Shahbaz-Erdogan video
SCO Summit : बीजिंग : चीनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) चीनच्या दौऱ्यावर गेले आहे. परिषदेसाठी जगभरातील अनेक देशाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी चीनेचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या आमंत्रणावरुन SCO परिषदेसाठी गेले आहेत. दरम्यान या परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिनही (Vladimir Putin) आले आहेत. तसेच पाकिस्तान आणि तुर्कीचे पंतप्रधानही उपस्थित राहिले आहे.
दरम्यान परिषदेवेळी सर्व सदस्य देशांच्या नेत्यांच्या औपचारिक फोटोसाठी एक सत्र देखील आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी पहिल्या रांगेत होते, त्यांच्यासोबत पुतिनि आणि शी जिनपिंगही उभे होते. यावेळी फोटो सत्रानंतर पंतप्रधान मोदी यांनी तुर्की आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी सोडून इतर सर्व राष्ट्राच्या नेत्यांशी चर्चा केली. यामुळे त्यांच्या या कृतीची सध्या जगभर चर्चा सुरु आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महासत्ता देशांची आज बैठक! पुतिन-मोदींच्या भेटीने बदलणार खेळ; SCO शिखर परिषदेवर जगाच्या नजरा
फोटो सेशन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी शी जिनपिंग, नेपाळचे केपी ओली शर्मा, ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मादबौली, बेलारुसचे अध्यक्ष असा सर्व नेत्यांची भेट घेतली. तसेच या सर्व नेत्यांमध्ये त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची खास भेट घेतली. सर्वांशी चर्चा केल्यानंतर पुतिन आणि मोदी दोघेही बोलत बोलत तिथून बाहेर पडले. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान मात्र याकडे उभे राहून पाहतच राहिले.
#WATCH | Prime Minister Narendra Modi, Chinese President Xi Jinping, Russian President Vladimir Putin, and other Heads of States/Heads of Governments pose for a group photograph at the Shanghai Cooperation Council (SCO) Summit in Tianjin, China.
(Source: DD News) pic.twitter.com/UftzXy6g3K
— ANI (@ANI) September 1, 2025
22 एप्रिल रोजी भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे तणावपूर्ण संबंध अधिक बिघडले. शिवाय या दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले होते. यामध्ये तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. पाकिस्तानला तुर्कीने लष्करी मदतही पुरवली होती. यामुळे भारत आणि तुर्कीचेही संबंध बिघडले. यामुळे परिषदेरम्यान पंतप्रधान मोदी तुर्की आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दुर्लक्षित करणे साहजिक आहे असे, तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र सध्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.