PM Modi phone call with Ukraine's Zelensky before meeting Putin
PM Modi Phone Call With Zelensky : बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) चीनच्या दौऱ्यावर असून येथे ते चीनच्या तियानजिनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) परिषदेत सहभागी झाले आहेत. यावेळी या परिषदेत पंतप्रधान मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांची भेट घेतील. दरम्यान या भेटीपूर्वी त्यांनी वोलोडिमिर झेलेन्स्कींशी (Volodymir Zelensky) फोनवरुन संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यावर चर्चा झाली.
या संंवादावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. मोदींनी म्हटले की, भारतालाही शांतता आणि स्थिरता हवी आहे. यासाठीच्या प्रयत्नांना भारत पूर्णपणे पाठिंबा देईल. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याची संवादाची माहिती दिली.
आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘मी राष्ट्रापती झेलेन्स्कींचे फोन कॉलबद्दल आभार मानतो. आम्ही युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केली. भारताचा मानतावादी प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.’ या राजनैतिक संवादामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव वाढला आहे.
पंतप्रधानांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी भारत आणि युक्रेनमधील द्विपक्षीय भागीदारीवरही चर्चा केली. तसेच दोन्ही देशात परस्पर हितसंबंध वाढवण्याच्या सहकार्यावरही चर्चा झाली.
दरम्यान यापूर्वी झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशीही चर्चा केली होती. त्यांनी या चर्चेची माहिती पंतप्रधान मोदींना दिली. झेलेन्स्की सांगितले की, ही चर्चा यशस्वी झाली. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक समान दृष्टीकोनातून चर्चा झाली. तसेच झेलेन्स्की यांनी रशियाशी भेटण्याची युक्रेनची तयारी सुरु असल्याचेही स्पष्ट केले. याच वेळी त्यांनी रशियाच्या हल्ल्यांचाही निषेध केला.
Thank President Zelenskyy for his phone call today. We exchanged views on the ongoing conflict, its humanitarian aspect, and efforts to restore peace and stability. India extends full support to all efforts in this direction. @ZelenskyyUa
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2025
सध्या पंतप्रधान मोदी चीनच्या तियानजिनमध्ये होणाऱ्या शांघाय संघटनेच्या सहकार्य परिषेदत सहभागी झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी रशियाच्या अध्यक्ष पुतिन यांची भेट घेणार आहे. टॅरिफवॉरदरम्यान ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे ५०% शुल्क लादले आहे. रशियाला युक्रेनविरुद्ध भारत अप्रत्यक्ष मदत करच असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. पण भारताने केवळ राष्ट्रीय हितासाठी आणि जागतिक स्थैर्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफला तीव्र विरोध करत अन्याकारक म्हटले आहे.
मोठी दुर्घटना! पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावर उलटली बोट; समुद्रात बुडून ६० हून अधिक लोकांचा मृत्यू