Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi UAE Visit : PM मोदींचा UAE दौरा संपन्न; ऊर्जा, तंत्रज्ञानासह अनेक करारांवर शिक्कामोर्तब

PM Modi UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यूई दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये उर्जा, सरंक्षण यांसारख्या अनेक क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी यूएईवरील हल्ल्याचाही तीव्र निषेध केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 15, 2026 | 04:38 PM
PM Modi UAE Visit

PM Modi UAE Visit

Follow Us
Follow Us:
  • PM मोदींचा UAE दौरा संपन्न
  • ऊर्जा, तंत्रज्ञानासह अनेक करारांवर शिक्कामोर्तब
  • यूएईकडून भारतात ५ अब्ज अमेरिकेन डॉलर गुंतवणुकीची घोषणा
PM Modi UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातील त्यांनी यूएईला भेट दिली. सध्या त्यांचा यूएईचा दौरा पूर्ण झाला असून आता ते नेदरलँडसाठी रवाना होती. आपण यूएई दौऱ्यात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

BRICS 2026 Summit : ब्रिक्स परिषदेत भारताचा दबदबा! Jaishankar यांच्या चार सूत्री अजेंडाची सर्वत्र चर्चा, वाचा सविस्तर

पंतप्रधान मोदी यांचे भव्य स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या अबुधाबी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांना राजकीय सन्मासह विशेष गार्ड ऑफ ऑनर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या दौऱ्यात पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशात उर्जा सुरक्षा आणि द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

भारत आणि यूएईमधील धोरणात्मक भागीदारी

अबुधाबी येथे यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि पंतप्रधान मोदी यांच्या उच्चस्तरीय, शिष्टमंडश स्तरीय बैठक पार पडली. या चर्चेत दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दपूर्ण समन्वय दिसून आला. पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना यूएईच्या अध्यक्षांनी, तुमच्या दुसऱ्या घरी स्वागत आहे असे म्हटले. तर पंतप्रधानमोदींनीही या हृदयस्पर्शी भावनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

  • पंतप्रधान मोदींनी भारत आणि यूएईमधील मैत्रीवर भाष्य करताना दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ असल्याचे म्हटले. तसेच भविष्यात दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करण्यावर सहमती दर्शवली.
  • याशिवाय व्यापार, उर्जा, आणि इतर विविध क्षेत्रातील संबंद अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
  • या ऐतिहासिक दौऱ्याला आर्थिक बळ देण्यासाठी दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांच्या उपस्थित भारत आणि यूएईमध्ये अनेक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये उर्जा, संरक्षण, पायाभूत सुविधा, जहाजवाहतूक आणि प्रगत तंत्रज्ञानासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे दोन्ही देशांच्या सर्वसमावेश धोरणात्मक भागीदारीला गती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.
  • तसेच यूएईने भारतात ५ अब्ज अमेरिकन डॉलरच्या गुंतवणूकीचीही घोषणी केली आहे. यामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक सहकार्याला भर मिळेल.

यूएईवरील हल्ल्याचा तीव्र निषेध

याशिवाय पंतप्रधानांनी यूएईवरील हल्ल्याचाही तीव्र शब्दात निषेध केला.यूएईला ज्याप्रकारे लक्ष्य करण्यात आले ते स्वीकारार्ह नाही असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी राष्ट्रीय एकता, सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता अबाधित राखण्यासाठी यूएईने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत केले. याशिवाय यूएईमधील भारतीया नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतल्याबद्दलही आभार व्यक्त केले. या संवादादरम्यान मानवी स्नेह आणि सहानुभूतीची झलकही दिसून आली. पंतप्रधान मोदींनी यूएईच्या राष्ट्राध्यक्षांचा बंधू म्हणून उल्लेख केला.

India Australia Defense : भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा

Web Title: Pm modi uae visit energy technology deals signed strategic partnership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • narendra modi
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
3

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.