PM Modi arrives in London, FTA agreement between India and Britain to be signed today
लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. सध्या ते ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये पोहोचले आहे. या दरम्यान पंतप्रधान मोदी ब्रिटनचे अध्यक्ष केयर स्टारमर यांची भेट घेतली. या दौऱ्यात भारत आणि ब्रिटनमध्ये महत्वाच्या मुक्त व्यापरा करारावर स्वाक्षरी होणार आहे. या करारमुळे दोन्ही देशांच्या व्यापाराला मोठी चालना मिळेल, तसेच नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपल्बध होतील.
पंतप्रधान मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना; द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर लक्ष
युरोपियन युनियन मधून ब्रिटनसाठी हा दुसरा सर्वात मोठा द्विपक्षीय करार ठरणार आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना ब्रिटीश बाजाराक प्रवेश अधिक सुलभ होईल. यामुळे ग्राहकांना अनेक उत्पादन वस्तू स्वस्त दरात उपल्बध होतील.
या वस्तू होणार स्वस्त
मुक्त व्यापार करारा (FTA) लागू झाल्यानंतर दोन्ही देशांतून आयात-निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क कमी होईल. यामध्ये भारताच्या कापड उद्योगाला मोठी चालना मिळेल. तसेच ब्रिटनमधील पेय पदार्थ, कॉस्मेस्टीक्स, महागाड्या गाड्या, वैद्यकीय उपकरणे या वस्तूंवरील सरासरी टॅरिफ १५ टक्क्यावरुन ३ टक्क्यापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
या करारामुळे भारताच्या निर्यातीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. शिवाय यामुळे ब्रिटनच्या स्वच्छ उर्जा उद्योगाला देखील भारतीय बाजारपेठे स्थान मिळले. जो भारतासाठी पर्यावरणपूरक ठरले. सध्या ब्रिटनमधून भारतात देशांत ११ अब्ज पौंड किमतीच्या वस्तू आयात होतात, परंतू या करारानंतूर टॅरिफमध्ये कपात होईल. तसेच ब्रिटनमधील भारतीय व्यावसायांना देखील चालना मिळेल. या करारामुळे ब्रिटन आणि भारताचा व्यापार १२० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Landed in London.
This visit will go a long way in advancing the economic partnership between our nations. The focus will be on furthering prosperity, growth and boosting job creation for our people.
A strong India-UK friendship is essential for global progress. pic.twitter.com/HWoXAE9dyp
— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2025
या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या India-UK २०३५ व्हिजनचे उद्घाटनही होणार आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध नव्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत मिळेल. सहकार्य, संरक्षण, हवामान बदल, शैक्षणिक संबंधांना प्रोत्साहन मिळेल. हे व्हिजन भारताच्या परस्पर हितसंबंधांच्या वचनाचे प्रतीक आहे.
या कराराचे ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी स्वागत केले आहे. त्यांनी होन्ही देशातील लोकांसाठी रोजगाराच्या संधी या करारातून उपलब्ध होतील असे म्हटले आहे. तसेच यामुळे भारत आणि ब्रिटनच्या प्रत्येक भागाता आर्थिक प्रगती होईल असेही त्यांनी म्हटले आहे. हा करारा भारत आणि ब्रिटनच्या सहकार्याची एक नवी संधी आहे. यामुळे भारताच्या पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
नेतन्याहूंना आता कोण वाचवणार? ‘या’ मुस्लिम राष्ट्रांची युती इस्रायलसाठी ठरणार घातक