नेतन्याहूंना आता कोण वाचवणार? 'या' मुस्लिम राष्ट्रांची युती इस्रायलसाठी ठरणार घातक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांनी फोनवरुन संवाद साधला आहे. यामुळे इस्रायलमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा इस्रायसाठी धोक्याची मानली जात आहे. या चर्चेला अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. तुर्कीला नुकतेच इस्लामिक सहकार्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. अशा परिस्थिती ही चर्चा इस्रायसाठी ही चर्चा घातक ठरत आहे.
यामागाचे कारण म्हणजे तुर्की OIC संघटनेमध्ये मुस्लिम देशांना इस्रायलविरोधी एकत्र आणण्यासाठी मोठा प्रभाव टाकू शकतात. तुर्कीने सुरुवातीपासूनच इस्रायलच्या गाझातील, आणि सीरियामधील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. तुर्कीने पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ इस्रायलच्या करावाया मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे अनेक वेळा म्हणले आहे.
या फोनवरील संवादादरम्यान अराघची आणि फिदान यांच्यात नुकत्याच घडलेल्या इस्रायल आणि इराण युद्धावर चर्चा झाली. तसेच सध्या प्रादेशिक घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा झाली. याशिवाय दोन्ही देशांमध्ये परस्पर हितसंबंध वाढवण्यावर आणि द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावरही चर्चा करण्यात आली.
दोन्ही मंत्र्यांनी गाझातील बिघडत चालेल्या परिस्थितीवर देखील चर्चा केली. सध्या इस्रायलचे गाझाती हल्ले वाढत आहे. अन्न वाटप केंद्रावर लोकांवर गोळीबार केला जात आहे. यामुळे शेकडो लोंकांचा बळी जात आहे. शिवाय उपासमारीमुळे देखील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दोन्ही नेत्यांनी इस्रायलविरोधी मुस्लि देशांना एकत्र आणण्याचे आणि संयुक्त कारवाई करण्याची चर्चा केली. यामुळे OIC संघटना एकत्र आल्या तर अमेरिका देखील इस्रायलाला वाचवू शकणार नाही.
🇮🇷| Seyed Abbas Araghchi, held a telephone conversation with Hakan Fidan, Foreign Minister of Türkiye and current Chairman of (OIC). They discussed bilateral relations and exchanged views on regional and international developments. pic.twitter.com/tSjxhaHkzo
— Government of the Islamic Republic of Iran🇮🇷 (@Iran_GOV) July 22, 2025
दोन्ही मंत्र्यांनी सीरियातील इस्रायलच्या हल्ल्याबद्दलही चर्चा केली आहे. गाझा आणि सीरियात इस्रायल राजवट मानवी गुन्हेगारीचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. यामुळे इस्रायलच्या या गुन्हेगारी कृत्यांना रोखण्याचा उद्देश इस्लामिक देशांनी केला आहे. इराण आणि तुर्की इस्लामिक देशांना इस्रायलविरोधी कडक कारवाईसाठी बैठक बोलावण्याचे म्हटले. गाझातील आणि सारियातील नरसंहार रोखणे हा याचा उद्देश असेल. सध्या या चर्चेमुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंची चिंता वाढली आहे.