पंतप्रधान मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना; द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर लक्ष (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. हा पंतप्रधान मोदींचा चौथा दौरा आहे.या दौऱ्यादरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर आणि किंग चार्ल्स यांची भेट पंतप्रधान मोदी घेणार आहेत. स्टारमर यांच्या कार्यकाळातील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यानंतर ते मालदीवच्या दौन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत.
हा दौरा भारत आणि ब्रिटनच्या व्यापार संबंधासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांत मुक्त व्यापार (FTA) काराराची घोषणा होणार आहे. तसेच संरक्षण, तंत्रज्ञान आणि हवामान यांसारख्या मुद्यांवरही चर्चा केली जाणार आहे.
दोन्ही देशांत गेल्या तीन वर्षापासून मुक्त व्यापार करारा (FTA) करारावर चर्चा सुरु होती. अखेर ६ मे २०२५ रोजी दोन्ही देशांमध्ये FTA करारावर सहमती दर्शवली. याकरारांतर्गत दोन्ही देशांतील अनेक उत्पादनांवरील कर कमी होणार आहे. यामुळे देशात रोजगाराच्या नवीन संंधी उपलब्ध होती. तसेच व्यापर आणि गुणंतवणूकीला चालना मिळेल. दोन्ही देशांतील व्यापार १२० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. अशा परिस्थितीत भारत आणि ब्रिटनमधील हा करार अत्यंत महत्वपूर्ण आहे. ब्रिटन आणि भारताच्या द्विपक्षीय संबंधासाठी देखील हा दौरा महत्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.
Delhi: Prime Minister Narendra Modi departs for a two-nation visit to the United Kingdom and Maldives.
PM Modi will pay an official visit to the United Kingdom from 23 – 24 July. In the second leg of his visit, PM will undertake a State Visit to Maldives from July 25–26.… pic.twitter.com/vGQEWJ9Khg
— ANI (@ANI) July 23, 2025
ब्रिटनच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. २५ ते २६ जुलै दरम्यान हा दौरा असेल. हा दौरा मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरुन होत आहे. हा पंतप्रधान मोदींचा मालदीवचा तिसरा दौरा आहे. यावेळी पंतप्रधान मोदी मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्य समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा होणार आहे. व्यापर आणि सागरी सुरक्षेसाठी भारत आणि मालदीवचे संबंध अधिक महत्वाचे मानले जात आहेत.