Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PoK Elections: ‘रडगाणे गाऊन जनादेश बदलणार नाही’; पाकिस्तानमध्ये निवडणुकीवरून मरियम नवाज आणि बिलावल भुट्टो यांच्यात खडाजंगी

PoK Election Results: पाकव्याप्त काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. मरियम नवाज यांनी बिलावल भुट्टो यांचे निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप फेटाळून लावले असून, त्यांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 29, 2026 | 02:29 PM
pok election results maryam nawaz replies to bilawal bhutto marathi news

pok election results maryam nawaz replies to bilawal bhutto marathi news

Follow Us
Follow Us:
  • PoK मधील निवडणुकीच्या निकालांनंतर राजकीय वादळ
  • बिलावल भुट्टो यांचे हेराफेरीचे आरोप
  • मरियम नवाज यांचे सडेतोड प्रत्युत्तर

पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे निकाल जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. निवडणुकीच्या निकालांमध्ये नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) पक्षाने मुसंडी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, या निकालांनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत मोठा गदारोळ उठवला आहे. बिलावल यांच्या या आरोपांनंतर पंजाबच्या मुख्यमंत्री आणि PML-N च्या वरिष्ठ नेत्या मरियम नवाज यांनी थेट मैदानात उतरत बिलावल भुट्टो यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

निवडणुकीच्या या टप्प्यात PML-N ने ९ जागांवर विजय मिळवला, तर बिलावल भुट्टो यांच्या PPP ला मीरपूर भागातील १३ पैकी अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले. आपल्या पक्षाचा झालेला हा दारुण पराभव पचवणे बिलावल भुट्टो यांना कठीण जात असल्याचे दिसून येत आहे. निकालांनंतर बिलावल यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत धांदल आणि हेराफेरी झाल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की, सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून PPP च्या हक्काचे बहुमत हिरावून घेण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Rain Day 2026: निसर्गाचे जीवनदायी वरदान आणि धरणीची तहान भागवणारा सण; जाणून घ्या या खास दिवसाचे विशेष महत्त्व

“रडगाणे गाऊन काहीही साध्य होणार नाही” – मरियम नवाज

बिलावल भुट्टो यांच्या या तक्रारींना उत्तर देताना मरियम नवाज यांनी एक विशेष व्हिडिओ संदेश जारी केला, जो सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे. मरियम नवाज यांनी अत्यंत कडक शब्दांत बिलावल यांना सुनावले की, “लोकशाहीत जय आणि पराजय हा जनतेचा कौल असतो, तो सरकारी यंत्रणा ठरवत नाहीत.” बिलावल यांनी पराभव स्वीकारण्याऐवजी रडगाणे गाणे आणि तक्रारी करणे सुरू केले आहे, परंतु अशा त्राग्याने जनादेश बदलणार नाही. पीपीपीने अत्यंत नम्रतेने आणि सन्मानाने आपला पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण केले पाहिजे.

CM Punjab Maryam Nawaz congratulated PM Shehbaz Sharif, Rana Sanaullah, Amir Muqam, and PML-N workers for securing 9 out of 13 seats in the AJK elections following a stellar campaign!
Addressing Bilawal Bhutto Zardari’s criticism, CM @MaryamNSharif emphasized that elections are… pic.twitter.com/D1QTb68PcT
— Sania Ashiq (@SaniaaAshiq) July 28, 2026

credit – social media and Twitter

आपल्या भाषणात मरियम यांनी बिलावल यांच्या नेतृत्वावर आणि सिंध प्रांतातील त्यांच्या कारभारावरही जोरदार प्रहार केला. त्या म्हणाल्या की, पीपीपी गेल्या १७ वर्षांपासून सिंध प्रांतात सत्तेवर आहे, परंतु तिथल्या रस्त्यांची दुरवस्था, कचऱ्याचे साम्राज्य आणि ढासळलेली कायदा व सुव्यवस्था पाहता त्यांच्या कारभाराचा पर्दाफाश होतो. संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान बिलावल भुट्टो यांच्याकडे जनतेला दाखवण्यासाठी आपल्या कामाचा कोणताही अहवाल किंवा भविष्यातील विकासाचा स्पष्ट आराखडा नव्हता. कामाचा अभाव लपवण्यासाठीच आता हेराफेरीचे खोटे आरोप केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Tiger Day: ‘वाघ वाचवा, जंगल वाचवा’; जाणून घ्या ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिना’निमित्त या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

शाहबाज सरकारमधील मंत्र्यांचीही बिलावल यांच्यावर टीका

केवळ मरियम नवाजच नव्हे, तर शाहबाज शरीफ सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांनीही बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी बिलावल यांचे दावे अलोकतांत्रिक आणि पायाहीन असल्याचे म्हटले आहे. तर केंद्रीय मंत्री तारिक फजल चौधरी यांनी स्पष्ट केले की, PML-N चा हा विजय स्थानिक जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये विकास, उत्तम आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा पुरवणे हेच आपल्या पक्षाचे मुख्य ध्येय असून, जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध राहील, असे आश्वासन मरियम नवाज यांनी शेवटी दिले.

Web Title: Pok election results maryam nawaz replies to bilawal bhutto marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Pakistan News
  • POK

संबंधित बातम्या

Breaking News : PoJK मध्ये लोकशाहीचा देखावा; भारताचा पाकिस्तानवर गंभीर आरोप
1

Breaking News : PoJK मध्ये लोकशाहीचा देखावा; भारताचा पाकिस्तानवर गंभीर आरोप

PoK protests: सर्वत्र फक्त मृतदेह…! पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तपात उसळला; निवडणुकीत उघडपणे गैरप्रकार
2

PoK protests: सर्वत्र फक्त मृतदेह…! पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तपात उसळला; निवडणुकीत उघडपणे गैरप्रकार

Breaking News :POK मध्ये पाकिस्तान विरोधात बंड , JAAC ने निवडणुकांवर केला बहिष्कार
3

Breaking News :POK मध्ये पाकिस्तान विरोधात बंड , JAAC ने निवडणुकांवर केला बहिष्कार

Terrorism News: पाकिस्तानात ‘इत्तिहाद-उल-मुजाहिदीन’चा थेट TTPला शह; हायटेक ड्रोन अन् आयईडी हल्ल्यांनी पाकिस्तान लष्कर हादरले
4

Terrorism News: पाकिस्तानात ‘इत्तिहाद-उल-मुजाहिदीन’चा थेट TTPला शह; हायटेक ड्रोन अन् आयईडी हल्ल्यांनी पाकिस्तान लष्कर हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.