Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Poland Attack: रशिया-युक्रेन युद्धाची धग आता थेट NATOपर्यंत; पोलंडच्या हद्दीत क्षेपणास्त्र कोसळल्याने युरोपमध्ये प्रचंड घबराट

Poland Missile Attack: युक्रेनवर रशियाच्या मोठ्या हवाई हल्ल्यांदरम्यान पोलंडमध्ये एक अज्ञात क्षेपणास्त्र पडले. पोलंडने तात्काळ एफ-१६ विमाने तैनात केली आणि आपल्या पूर्व सीमेवर उच्च सतर्कतेचा इशारा दिला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 30, 2026 | 04:17 PM
poland missile attack russian strike nato airspace violation marathi news

poland missile attack russian strike nato airspace violation marathi news

Follow Us
Follow Us:
  • पोलंडच्या हद्दीत क्षेपणास्त्र कोसळले
  • पूर्व सीमेवर हाय अलर्ट अन् एफ-१६ तैनात
  • युक्रेनवर भीषण हल्ला अन् F-16 कोसळले

रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेले विनाशकारी युद्ध आता एका अत्यंत धोकादायक आणि चिंताजनक वळणावर येऊन पोहोचले आहे. गुरुवारी (३० जुलै २०२६) पहाटेच्या सुमारास रशियन दलाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भीषण हवाई हल्ला चढवला. या भीषण गोळीबार आणि बॉम्बवर्षावाचा थेट फटका शेजारील नाटो (NATO) सदस्य देश असलेल्या पोलंडला बसला आहे. युक्रेनच्या हद्दीत मारा करत असताना एक रशियन क्षेपणास्त्र पोलंडच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करून थेट देशाच्या आत कोसळल्याने संपूर्ण युरोप खंडात आणि आंतरराष्ट्रीय समुदायात खळबळ उडाली आहे.

पोलिश लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे ३:४० च्या सुमारास पोलंडच्या रडार प्रणालीवर एक संशयास्पद आणि अज्ञात वस्तू पोलिश हवाई हद्दीत घुसताना दिसून आली. ही वस्तू युक्रेनियन सीमेपासून तब्बल ९० किलोमीटर आत असलेल्या ल्युबलिन प्रांतातील तारनावा-कोलोनिया (Tarnawa-Kolonia) गावाजवळील एका शेतात जाऊन कोसळली. क्षेपणास्त्र कोसळल्यामुळे शेतात सुमारे १० मीटर रुंदीचा मोठा खड्डा तयार झाला आणि जोरदार स्फोटाचा आवाज झाला, ज्यामुळे परिसरातील गावकरी भीतीच्या छायखाली आले.

पंतप्रधान डोनाल्ड टस्क घटनास्थळी; एफ-१६ विमानांची हवेत गस्त

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क (Donald Tusk) यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द केले आणि परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. प्राथमिक तपासणीनंतर हे रशियन ‘Kh-101’ क्रूझ क्षेपणास्त्र असण्याची दाट शक्यता पोलिश सरकार आणि लष्करी सूत्रांनी व्यक्त केली आहे. पोलंडचे संरक्षण मंत्री व्लादिस्लाव कोसिनियाक-कामीश यांनी ही रात्र पोलिश हवाई दल आणि संरक्षण यंत्रणांसाठी “अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक रात्र” असल्याचे वर्णन केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  PoK Violence: पाकव्याप्त काश्मीर पेटले! अंदाधुंद गोळीबार करत पाकिस्तानी सैन्याचे भीषण तांडव; निष्पापांच्या मृतदेह देण्यास नकार

क्षेपणास्त्राची घुसखोरी ओळखून पोलंडच्या लष्कराने तातडीने आपली एफ-१६ (F-16) लढाऊ विमाने सीमेवर तैनात केली. खबरदारीचा उपाय म्हणून पूर्व पोलंडमधील अनेक शहरांमध्ये तब्बल दीड तासांपेक्षा जास्त वेळ आपत्कालीन सायरन वाजवले जात होते. नाटोच्या थेट उंबरठ्यावर रशियन क्षेपणास्त्र पडल्यामुळे नाटो आणि रशिया यांच्यात थेट लष्करी संघर्ष पेटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

रशियाचा युक्रेनवर महाहल्ला: ७४ क्षेपणास्त्रे अन् २८४ ड्रोनचा मारा

राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आधीच इशारा दिल्याप्रमाणे रशियाने युक्रेनवर एकाच रात्रीत ७४ क्रूझ, बॅलिस्टिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे तसेच २८४ ‘शाहेद’ (Shahed) आत्मघाती ड्रोन डागले. युक्रेनियन हवाई दलाने बहुतांश ड्रोन पाडले असले तरी, क्षेपणास्त्रांनी कीव्ह, क्रिव्ही रिह आणि विशेषतः पश्चिम युक्रेनमधील ल्विव (Lviv) शहरात प्रचंड विध्वंस घडवून आणला. ल्विव शहरात निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र पडल्याने लहान मुलांसह ३० हून अधिक नागरिक जखमी झाले, तर इतर शहरांमध्ये मिळून ८ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Red Sea Crisis: इराणला मोठा धक्का! हुथींविरुद्ध सौदीच्या नव्या सैनिकी आघाडीत आशियातील ‘हे’ दोन मुस्लिम देश सामील

युक्रेनचे एफ-16 विमान कोसळले; तांत्रिक बिघाडामुळे अपघात

युक्रेनसाठी युद्धभूमीवरून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. या भीषण रशियन हवाई हल्ल्याचा प्रतिकार करताना आणि हवेतच रशियन क्षेपणास्त्रे नष्ट करण्याच्या मोहिमेवर असताना युक्रेनचे एक एफ-१६ (F-16) लढाऊ विमान अपघाताचा बळी ठरले. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, हवेत रशियन क्षेपणास्त्रांना रोखत असताना विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे विमान कोसळले. सुदैवाने वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमानातून सुरक्षितपणे बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. पोलंड आणि नाटोच्या सीमेवर घडलेल्या या घटनेमुळे जागतिक राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, नाटो देश यावर काय पावले उचलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Poland missile attack russian strike nato airspace violation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • Nato
  • Russia Ukraine War
  • World War 3

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : रशियाला अब्जावधींचा फटका! युक्रेनियन सैन्याने उडवला रशियन तेल प्रकल्प; आकाशात धुराचे लोट, पहा VIDEO
1

Russia Ukraine War : रशियाला अब्जावधींचा फटका! युक्रेनियन सैन्याने उडवला रशियन तेल प्रकल्प; आकाशात धुराचे लोट, पहा VIDEO

G20Atlanta : भारत बनला ग्लोबल पीसमेकर; रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडले 3 मुख्य अजेंडे
2

G20Atlanta : भारत बनला ग्लोबल पीसमेकर; रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडले 3 मुख्य अजेंडे

World News : रशिया युक्रेनच्या युद्धाची शिक्षा डॉल्फिनला ;काळ्या समुद्रातील १ लाख २० हजारांहून अधिक डॉल्फिनचा मृत्यू
3

World News : रशिया युक्रेनच्या युद्धाची शिक्षा डॉल्फिनला ;काळ्या समुद्रातील १ लाख २० हजारांहून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

US Iran war : इराणला युरेनियमचा साठा हटवावा लागणार? अमेरिका-इराण करारात कतार अन् चीनची मोठी भूमिका
4

US Iran war : इराणला युरेनियमचा साठा हटवावा लागणार? अमेरिका-इराण करारात कतार अन् चीनची मोठी भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.