Political war rages in Oval House, Donald Trump has verbal clash with zelensky, macron to ramaphosa
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असतात. राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहे, जी चर्चेचा विषय ठरली आहे. आता हेच पाहा ना काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी अमेरिकेच्या मध्यस्थीने झाल्याचा दावा त्यांनी केला होती, परंतु काही दिवसांनी त्यांना आपल्या विधानावरुन माघार घेतली होती.
तसेच फेब्रुवारीमध्ये झेलेन्स्कीसोबतच्या वादामुळेही ते चर्चेचा विषय बनले होते. तर पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी झालेल्या वादानंतर चर्चेचा विषय बनले आहेत. यापूर्वी देखील अनेक जागतिक नेत्यांशी ट्रम्प यांची ओव्हल ऑफिसमध्ये वादावादी झाली आहे. युक्रेनपासून ते फ्रान्सपर्यंत अनेक देशाच्या नेत्यांनी ट्रम्प यांना आव्हान दिले आहे.
बुधवारी (२१ मे) व्हाईट हाऊसमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि ट्रम्प यांच्या जोरदार वादविवाद झाला. दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या शेतकऱ्यांच्या हत्तेवरुन हा वाद सुरु झाला. ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर गोऱ्या शेतकऱ्यांच्या हत्तेमुळे देशातील परिस्थिती वाईट झाली आहे आणि तेथील लोक अमेरिकेत पळून येत आहेत असा आरोप केला.
परंतु दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी ट्रम्प यांचे आरोप फेटाळून लावले. त्यांनी म्हटले की, दक्षिण आफ्रिकेत केवळ गोरेच नाही तर अश्वेत लोकही हिंसाचाराला बळी पडत आहेत. ट्रम्प यांचा आरोप जातीयवादी मानसिकत आहे. देशाच्या समस्या एकात जातीपुरत्या मर्यादित ठेवणे चुकीचे आहे.
तसेच रामाफोसा यांनी ट्रम्प यांना कतारकडून भेट मिळालेल्या विमानवरही टिका केली. त्यांनी म्हटले की, माफ करा, आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी विमान नाही. यावरुन ट्रम्प यांनी तुमच्याकडे असते तर मी घेतले असते असे त्यांनी म्हटले.
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी ओवल ऑफिसमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. झेलेन्स्की यांनी ट्रम्प रशियासारक्या देशांना पाठिंबा देत असल्याचा आरोप केला होता. झेलेन्स्की आमि ट्रम्प यांच्यातीव वाद इतका वाढला होता की, झेलेन्स्की बैठक अर्ध्यातच सोडून गेले होते. या घटनेमुळे अमेरिकेच्या युक्रेन धोरणावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांची झालेल्या भेटीदरम्यान देखील मोठा वाद झाला होता. त्यावेळी ट्रम्प यांनी दावा केला होता की, युरोप युक्रेनला मदत अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय मदत करु शकणार नाही, त्यावेळी अध्यक्ष मॅक्रों यांनी फ्रान्स युक्रेनला निधीच्या स्वरुपात मदत करत असल्याचे म्हटले. मॅक्रो यांनी खोट्या बातम्या न पसरवण्याचा ट्रम्प यांना म्हटले होते.
तसेच मार्क कार्नी यांच्याशी सध्या ट्रम्प यांचा वाद सुरु असल्याचे समोर येत आहे. परंतु अद्याप दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही.