
PM Modi Eathiopia Visit Update
इथिओपिया ही जगातील 18 वी संसद असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या संसदेत भाषण करणारे जागतिक स्तरावरील महत्त्वाचे नेते ठरले आहे. यावेळी त्यांनी भारत आणि इथिओपियातील मैत्रीचा, सांस्कृतिक नात्याचा आणि मूल्यांचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, दोन्ही देशांतील संस्कृतीची मुळे ही अत्यंत प्राचीन आहेत, यामुळे दोन्ही देश राजकारणापलीकडे जाऊन एकमेकांशी जो़डले गेले आहेत. त्यांनी इथिओपियाच्या संसदेला लोकशाहीचे मंदिर म्हणून वर्णिले असून जनतेची इच्छा हेच राज्याचे धोरण असे सांगितले आहे.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारताच्या राष्ट्रगीताचा वंदे मातरम आणि इथिओपियाच्या राष्ट्रागीतामधील साम्यतेचा देखील उल्लेख केला. दोन्ही गीतांमध्ये मातृभूमीचे गौरवगान असल्याचे त्यांनी म्हटले.
याशिवाय पंतप्रधान मोदींनी इथिओपियाच्या संसदेत दहशतवादावार प्रहार करत पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) तीव्र निषेध केला. त्यांनी जागतिक स्तरावर सर्व देशांनी दहशतवादाविरोधात एकजुट होण्याचे आणि त्याला नष्ट करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी यांनी इथिओपियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ग्रेटर ऑनर निशान ऑफ इथिओपिया’ने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा सन्मान मिळवणारे ते पहिले जागतिक नेते ठरले असून त्यांनी हा सन्मान 140 कोटी भारतीयांना समर्पित केला आहे. भारत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या धोरणावर चालत भविष्याकडे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.
#WATCH | Addis Ababa, Ethiopia: PM Narendra Modi says, “On this occasion, I also express heartfelt gratitude to my friend PM Abiy Ahmed Ali. Last month, when we met during the G20 Summit in South Africa, with great love and right, you had urged me to visit Ethiopia. How could I… pic.twitter.com/zEKkmmkP8R — ANI (@ANI) December 16, 2025
Ans: पंतप्रधान मोदींनी इथिओपियाच्या संसदेत भारतीयांच्या वतीने सद्भावना आणि सहकार्याचा संदेश दिला आहे.
Ans: पंतप्रधान मोदी यांनी इथिओपियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार 'द ग्रेटर ऑनर निशान ऑफ इथिओपिया'ने सन्मानित करण्यात आले.
Ans: पंतप्रधान मोदींनी इथिओपियाच्या संसदेत दहशतवादावार प्रहार करत दहशतवादाविरोधात एकजुट होण्याचे आवाहन केले.