Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत ‘No Entry’! ट्रम्प यांनी ‘या’ देशांवर घातली प्रवेशबंदी; जाणून घ्या कधीपासून लागू होणार

US Travel Ban Update : ट्रम्प यांनी एक मोठी निर्णय घेतला आहे. नुकतेच सुरक्षा अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी ३९ देशांवरील प्रवासबंदी वाढवली आहे. जाणून घ्या कधीपासून लागू होणार ही बंदी?

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 17, 2025 | 11:40 AM
US Travel Ban

US Travel Ban

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत नो एन्ट्री
  • ट्रम्प यांनी ३९ देशांवरील प्रवासबंदी वाढवली
  • १ जानेवारी पासून लागू होणार नियम
US Travel Ban News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) वाढत्या सुरक्षेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी ३० हून अधिक देशांवर बंदी घातली आहे. १ जानेवारी २०२६ पासून हा निर्णय लागू होणार आहे. नुकतेच वॉशिंग्टन डीसी येथे घडलेल्या सुरक्षा दलांवरील हिंसक हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोण कोणत्या देशांचा समावेश आहे हे जाणून घेऊयात.

ट्रम्प यांची मांडूळाची चाल! अनेक टीकांनंतर गायले पंतप्रधान मोदींचे गुणगाण

ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत इमिग्रेशन धोरणे कडक केली आहेत. मंगळवारी (१६ डिसेंबर) ट्रम्प यांनी आणखी सात देश आणि पॅलेस्टिंनीवर अमेरिकेत प्रवासबंदी लागू केली आहे. यामध्ये इतर १५ देशांच्या नागरिकांवरील बंदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता एकूण ३९ देशांवर ट्रम्प प्रशासनाने बंदी घातली आहे.

ट्रम्प यांनी या देशांवर घातली बंदी

ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी जाहीर केलेल्या घोषणेनुसार, बुर्किना फासो, माली, नायजर, दक्षिण सुदानस, सीरियावर प्रवास बंदी लागू केली आहे. यामध्ये पॅलेस्टिनींवर देखील बंदी घातली आहे. याशिवाय लाओस, सिएरा लिओन या देशांवरही पूर्ण प्रवासबंदी लागू करण्यात आली आहे.

यामध्ये अंगोला, अँटिग्वा आणि बारबुडा, बेनिन, कोट डी आयव्होअर, डोमिनिका, गॅबॉन, द गॅम्बिया, मलावी, मॉरिटानिया, नायजेरिया, सेनेगल, टांझानिया, टोंगा, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांच्या नागरिकांवर काही प्रमाणात प्रवेश निर्बंध लादले आहेत. तर बुरुंडी, क्युबा, टोगो आणि व्हेनेझुएलाच्या नागरिकांवरली निर्बंध वाढवले आहेत.

याशिवाय अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशांतील नागरिकांना अमेरिकेत आधीपासून नो एन्ट्री आहे.

१ जानेवारीपासून लागू होणार नियम

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व देशांवरील पूर्ण प्रवासबंदी आणि प्रवास निर्बंध हे १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. ट्रम्प प्रशासनाने याचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, अमेरिकेत वाढते दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी, व्हिसा स्क्रीनिंग सिस्टम, व्हिसा ओव्हरस्टे दर, अंतर्गत संघर्ष या कारणांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अमेरिकेत सुरक्षा दलावर हल्ला

गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबर २०२५ रोजी वॉशिंग्टन डीसी येथे दोन नॅशनल गार्ड्स सैनिकांवर हल्ला करण्यात आला होता. एका अफगाण नागरिकाने हा हल्ला केला होता. ज्यामुळे ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शिवाय सीरियामध्ये देखील दोन दिवसापूर्वीच अमेरिकेच्या तळावर हल्ला झाला होता, ज्यामध्ये दोन अमेरिकन सैनिक आणि एक अमेरिकन दुभाषिख ठार झाले होते. अमेरिकन नागरिकांवरील वाढत्या हल्ल्यांमुळेच ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला होता.

US Travel Ban : 30 हून अधिक देशांना अमेरिकेत प्रवेश करण्यास घालण्यात येणार बंदी; लवकरच Donald Trump जाहीर करणार यादी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प प्रशासनाने किती देशांवरील प्रवासबंदी वाढवली आहे?

    Ans: ट्रम्प प्रशासनाने 39 देशांवरील प्रवासबंदी वाढवली आहे?

  • Que: ट्रम्प प्रशासनाने प्रवासबंदीचा निर्णय का लागू केला आहे?

    Ans: ट्रम्प प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा, वाढते दहशतवादी धोके, कमकुवत व्हिसा तपासणी प्रणाली, व्हिसा ओव्हरस्टे दर, या सर्व कारणांमुळे ३९ देशांवर प्रवासबंदी लागू केली आहे.

  • Que: अमेरिकेत ३९ देशांवरील प्रवासबंदी कधीपासून लागू होणार आहे?

    Ans: अमेरिकेत ३९ देशांवरील प्रवासबंदी १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे.

Web Title: Us trump expands travel ban on 39 countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

ट्रम्प यांची मांडूळाची चाल! अनेक टीकांनंतर गायले पंतप्रधान मोदींचे गुणगाण
1

ट्रम्प यांची मांडूळाची चाल! अनेक टीकांनंतर गायले पंतप्रधान मोदींचे गुणगाण

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भीषण दुर्घटना; केबल कार अचानक थांबल्याने डझनभरहून लोक जखमी
2

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भीषण दुर्घटना; केबल कार अचानक थांबल्याने डझनभरहून लोक जखमी

Weapon of Mass Destruction: ‘ही’ 2 मिलीग्रामची टॅब्लेट बॉम्बपेक्षाही घातक; ज्यामुळे अमेरिकेत दरवर्षी 100,000 लोक पडतात मृत्युमुखी
3

Weapon of Mass Destruction: ‘ही’ 2 मिलीग्रामची टॅब्लेट बॉम्बपेक्षाही घातक; ज्यामुळे अमेरिकेत दरवर्षी 100,000 लोक पडतात मृत्युमुखी

India Jordan At 75: PM Modi यांचा जॉर्डन दौरा आहे एक बुद्धिबळाची चाल; इतर कोणत्याही अरब देशाकडे नाहीये ‘अशी’ अद्वितीय ढाल
4

India Jordan At 75: PM Modi यांचा जॉर्डन दौरा आहे एक बुद्धिबळाची चाल; इतर कोणत्याही अरब देशाकडे नाहीये ‘अशी’ अद्वितीय ढाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.