Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझे मित्र ट्रम्प…’ PM मोदी यांनी गाझा शांती कराराबाबत दिल्या Donald Trump यांना शुभेच्छा, ट्रेड डीलबाबतदेखील चर्चा

गाझामध्ये शांतता आणण्यासाठी इस्त्राईल आणि हमासदम्यान झालेल्या शांतता कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 09, 2025 | 10:13 PM
डोनाल्ड ट्रम्पचे पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

डोनाल्ड ट्रम्पचे पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझामधील शांतता कराराच्या यशाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले
  • गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी आणि ओलिसांना सोडण्यासाठी ट्रम्प यांच्या पुढाकारावर इस्रायल आणि हमास सहमत झाले आहेत 
  • हा करार दोन वर्षांच्या युद्धातील सर्वात मोठे यश मानले जात आहे आणि शांततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझामधील शांततेसाठी झालेल्या ऐतिहासिक कराराबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणाबाबत, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोललो आणि ऐतिहासिक गाझा शांतता योजनेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.” पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, व्यापार चर्चेत झालेल्या चांगल्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. येत्या आठवड्यात जवळच्या संपर्कात राहण्यावर सहमती झाली.

‘भारताशी संबंध तात्काळ सुधारा, नाहीतर…’ ; अमेरिकन कॉंग्रेस खासदारांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा

कराराचे स्वागत केले 

Spoke to my friend, President Trump and congratulated him on the success of the historic Gaza peace plan. Also reviewed the good progress achieved in trade negotiations. Agreed to stay in close touch over the coming weeks. @POTUS @realDonaldTrump — Narendra Modi (@narendramodi) October 9, 2025

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पश्चिम आशियासाठीच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर झालेल्या कराराचे स्वागत केले, ज्याअंतर्गत इस्रायल आणि हमास यांनी गाझामध्ये लढाई थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी म्हणाले की हा करार इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचे प्रतिबिंब देखील आहे.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर झालेल्या कराराचे आम्ही स्वागत करतो. हे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचे देखील प्रतिबिंब आहे.” ते म्हणाले, “आम्हाला आशा आहे की ओलिसांची सुटका आणि गाझाच्या लोकांना मानवतावादी मदत पोहोचवल्याने त्यांना दिलासा मिळेल आणि कायमस्वरूपी शांततेचा मार्ग मोकळा होईल.”

दोन वर्षांचे युद्ध संपणार

इजिप्तमधील दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या करारावर स्वाक्षरी झाल्याचे निश्चित करण्यात आले. दोन वर्षांचे युद्ध संपवण्याच्या दिशेने उचललेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल आहे. या करारांतर्गत, गाझामध्ये युद्धबंदी लागू केली जाईल. इस्रायल गाझामधून अंशतः माघार घेईल आणि इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात हमासने ताब्यात घेतलेल्या ओलिसांना सोडेल.

गाझा आरोग्य मंत्रालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की ७ ऑक्टोबर २०२३ पासून गाझावरील इस्रायली हल्ल्यात ६७,१३९ पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि १६९,५८३ जण जखमी झाले आहेत. बळी पडलेल्यांपैकी बहुतेक नागरिक होते, ज्यात अनेक महिला आणि मुले यांचा समावेश आहे.

ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याला इस्रायल-हमास सहमत; पंतप्रधान मोदींनीही केलं स्वागत, म्हणाले..

ट्रम्पचा जेनेरिक औषधांवर दिलासा 

भारत-अमेरिका व्यापार करारावर अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही. दोन्ही देशांचे प्रतिनिधींदरम्यान सध्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, अमेरिकेने जेनेरिक औषधांच्या आयातीवर (ट्रम्प टॅरिफ ऑन जेनेरिक ड्रग) कर लादण्याची योजना तात्पुरती पुढे ढकलली आहे. ट्रम्पच्या या निर्णयामुळे भारतीय औषध कंपन्यांना मोठा दिलासा मिळेल. भारतीय औषध कंपन्या अमेरिकेत सुमारे ५० टक्के जेनेरिक औषधांचे उत्पादन करतात.

Web Title: Prime minister narendra modi congratulated us president trump over gaza peace deal called him friend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 10:12 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Gaza
  • PM Modi
  • World news

संबंधित बातम्या

PoK मध्ये सत्तापालटाचे संकेत! पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे युती सरकार कोसळणार?
1

PoK मध्ये सत्तापालटाचे संकेत! पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे युती सरकार कोसळणार?

Narendra Modi: ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट झाल्यावर PM मोदी म्हणाले, ” आजच्या बैठकीत…”
2

Narendra Modi: ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट झाल्यावर PM मोदी म्हणाले, ” आजच्या बैठकीत…”

Nobel Prize in Literature 2025 : साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर, हंगेरियन लेखक लास्झलो यांना ₹10 कोटी, सुवर्णपदक मिळणार
3

Nobel Prize in Literature 2025 : साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर, हंगेरियन लेखक लास्झलो यांना ₹10 कोटी, सुवर्णपदक मिळणार

बगराम एअर बेस आणि चाबहार पोर्ट…अफगाणी विदेश मंत्री मुत्ताकीच्या अजेंड्यात नेमके काय? भारतातील रूपरेषा काय
4

बगराम एअर बेस आणि चाबहार पोर्ट…अफगाणी विदेश मंत्री मुत्ताकीच्या अजेंड्यात नेमके काय? भारतातील रूपरेषा काय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.