
Putin Talks with Kim Jong Un before meeting Trump in Alaska
ही चर्चा अशा वेळी झाली आहे, जेव्हा पुतिन दोन दिवसांनी अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यामुळे हा ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पुतिनच्या जाळ्यात अडकले ट्रम्प? अलास्का बैठक रशियासाठी ठरणार ‘गेम चेंजर’?
उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी मंगळवारी (१२ ऑगस्ट) किम जोंग उन यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी पुतिन यांनी उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या शौऱ्याचे आणि आत्मत्यागाचे कौतुक केले. तसेच रशियाला सैन्य मदत पाठवल्याबद्दल आभारही मानले. उत्तर कोरियाने मोठ्या प्रमाणात रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात लढण्यासाठी सैन्य पाठवले आहे.
तसेच पुतिन यांनी अलास्कामध्ये होणाऱ्या ट्रम्प यांच्याशी बैठकीची माहिती किमला दिली. पुतिन यांनी ट्रम्प यांच्याशी होणाऱ्या अगामी चर्चेवर आपले मत किम जोंग उन यांना सांगितले.
यावेळी किम यांनी उत्तर कोरिया रशियाच्या बाजूने उभा राहिले असे आश्वासन दिले. गेल्या वर्षी रशिया आणि उत्तर कोरियामध्ये झालेल्या धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावरही दोघांनी चर्चा केली. किम जोंग उन यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia Ukriane War) सुरुवातीपासून मॉस्कोला पाठिंबा दिला आहे. याअंतर्गत किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाकडून रशियाला १५ हजार सैनिकांची आणि लष्करी संसाधनांची मदतही पुरवली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पुतिन यांच्यात रशिया-युक्रेन युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे. ही चर्चा अलास्कामध्ये होणार असून हा रशियासाठी मोठा विजय मानला जात आहे. अलास्का हा सुरुवातील रशियाचा भाग होता. परंतु १८६७ च्या दशकात अमेरिकेने ७२ मिलियन डॉलर्सला अलास्का खरेदी केले होते. तसेच पुतिन विरोधाक ICC ने अटक वॉरंट जारी केले असताना ते अमेरिकेला जात आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये ही बैठक होत असून हा रशियासाठी अत्यंत महत्वपूर्ण विजय असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
इस्रायलची ‘गाझावर’ नियंत्रणाची तयारी सुरु; नेतन्याहूंनी पॅलेस्टिनींना दिला युद्धभूमी सोडण्याचा आदेश