इस्रायलची 'गाझावर' नियंत्रणाची तयारी सुरु; नेतन्याहूंनी पॅलेस्टिनींना दिला युद्धभूमी सोडण्याचा आदेश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
यामुळे डोनाल्ड ट्रम्पसह अनेक जागतिक नेत्यांनी पॅलेस्टिनींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. इस्रायलच्या या योजनेचा तीव्र निषेध केला जात आहे. सौदी अरेबिया आणि मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलच्या या योजनेला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन म्हटले आहे.
इस्रायलच्या ‘गाझावर ताबा’ योजनेला ‘या’ मुस्लिम देशांनी केला विरोध; जाणून घ्या कोण काय म्हणाले?
सध्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी (Benjamin Netanyahu) पॅलेस्टिनींना युद्धभूमीतून हटण्यास सांगितले आहे. इस्रायल हमासला गाझामधून हटवण्यासाठी कारवाया सुरु करत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. इस्रायलने म्हटले आहे की, त्यांना गाझावर राज्य करायचे नाही, तर केवळ हमासला नष्ट करायचे आहे. त्यानंतर गाझा अरब देशांना सोपवण्याचे नेतन्याहूंनी म्हटले आहे. यामुळे आता इस्रायल आणि हमास युद्धाचा (Israel Hamas War ) शेवट लवकरच होणार असे मानले जात आहे. ६० दिवसांत हे युद्ध संपण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काय आहे इस्रायलची नेमकी योजना?
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने यासंबंदित एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, इस्रायली सैन्य गाझा सिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तयारी करत आहे. यासाठी आम्ही पाच सुत्रे ठरवली आहे.
पुतिनच्या जाळ्यात अडकले ट्रम्प? अलास्का बैठक रशियासाठी ठरणार ‘गेम चेंजर’?






