Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia On Trump : ‘हा रशियासाठी धोका’ ; ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीवर पुतिन यांचा इशारा

रशिया आणि अमेरिकेमध्ये अलीकडच्या काळात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धावरुन हा तणाव वाढत आहे. यामुळे अमेरिका रशियाशी व्यापारी संबंध असलेल्या भारत, चीन आणि ब्राझील यांसारख्या देशांवर दबाव आणत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 05, 2025 | 06:14 PM
Putin warns on Trump's tariff threat to India

Putin warns on Trump's tariff threat to India

Follow Us
Follow Us:
  • रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून दबाव आणला जात आहे.
  • दरम्यान रशिया आपल्या व्यापारी भागीदार देशांच्या समर्थनार्थ उतरला आहे.
  • रशियाने ट्रम्प यांच्या धमकीला सडेतोड उत्तर दिले आहे.
Russia On Trump Threat to India : मॉस्को : सध्या रशियाकडून (Russia) तेल खरेदीवरुन अमेरिका आणि युरोपियन युनियन भारताला धमकी देत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% करही लागू केला आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच वेळी रशिया आता आपल्या व्यापारी मित्रांच्या समर्थनार्थ उतरला आहे. रशियाने या धमक्यांना तीव्र विरोध केला आहे.

रशियाच्या व्यापारी मित्रांना धमकावू नका

रशियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना त्यांच्या व्यापार भागीदार देशांना न धमकवण्याचे म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन(Vladimir Putin) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना तीव्र विरोध केला आहे. तसेच क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी अमेरिकेच्या धमक्या अयोग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच रशियाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही देशांना व्यापारी भागीदार निवडण्यासाठी भाग पाडणे शक्य नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मित्राला नजरकैद; ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

राष्ट्राचे हित साधण्याचा प्रत्येक देशाला अधिकार आहे – दिमित्री पेस्कोव्ह

दिमित्री पेस्कोव्ह यांनी, रशियाशी व्यापार संबंध असलेल्या  मित्र देशांना त्यांचा भागीदार निवडण्याचा अधिकार आहे, यामुळे अशा धमक्या देणे निरर्थक असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी म्हटले की, कोणत्याही देशाला रशियासोबत व्यापार थांबवण्यासाठी भाग पाडणे देखील चुकीचे आहे. या कृतीला रशियासाठी आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी धोका समजले जाईल.

दिमित्री पेस्कोव्ह यांनी, प्रत्येक देशाला त्यांच्या सार्वभौमत्वासाठी त्यांचे व्यापारी भागीदार आणि आर्थिक भागीदार निवडण्याचा अधिकार आहे. आपल्या राष्ट्राचे हित जपण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे असे म्हटले आहे.

ट्रम्प यांची भारताला धमकी

नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाशी व्यापार केल्यामुळे २५% टक्के कर लागू केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी भारतावर हल्ला बोल केला आहे. ट्रम्प यांनी भारतावर रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये लोक मरत आहेत आणि याचा भारताला कोणताही फरक पडत नसल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता भारताला २५% टॅरिफ द्यावेच लागणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.

भारताचे ट्रम्प यांच्या धमकीला चोख उत्तर 

याच वेळी भारताने देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या आरोपांना तीव्र विरोध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, भारताला लक्ष्य केले जात आहे, हे चुकीचे असून अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या शब्द आणि कृतीमध्ये तितकाच फरक आहे.

भारताने स्पष्ट केले आहे की, जसा अमेरिका आणि युरोपीय देशांना रशियाशी व्यापार करण्याचा आणि देशाचे हित साधण्याचा अधिकार आहे, तसाच अधिकार भारतालाही आहे. यामुळे अमेरिका आणि युरोपीय देश दुटप्पीपण करत आहे. तसेच असेही स्पष्ट केले आहे की, भारत मोठी अर्थव्यवस्था असून आपल्या देशाचे राष्ट्रीय आणि आर्थिक हितासाठी योग्य ती पावले उचलत राहील.

पुतिन यांचा संताप अनावर! अमेरिकेच्या धमकीनंतर ‘या’ क्षेपणास्त्राच्या तैनातीवर घेतला मोठा निर्णय

Web Title: Putin warns on trumps tariff threat to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Russia
  • Russian President Putin
  • World news

संबंधित बातम्या

Candida Auris: अमेरिकेत ‘कॅन्डिडा ऑरिस’ प्राणघातक बुरशीचा उद्रेक; औषधांनाही दाद न देणाऱ्या ‘सुपरबग’मुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर
1

Candida Auris: अमेरिकेत ‘कॅन्डिडा ऑरिस’ प्राणघातक बुरशीचा उद्रेक; औषधांनाही दाद न देणाऱ्या ‘सुपरबग’मुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

Meta Lawsuit : मेटा अडचणीत, भारतात मागावी लागली माफी; अमेरिकेत भरावे लागणार 54 अब्ज रुपये, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण?
2

Meta Lawsuit : मेटा अडचणीत, भारतात मागावी लागली माफी; अमेरिकेत भरावे लागणार 54 अब्ज रुपये, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण?

Jacob Zuma: दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई; फरार उद्योगपती अजय गुप्ता यांच्यासोबत दिसल्याने राजदूताची उचलबांगडी
3

Jacob Zuma: दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई; फरार उद्योगपती अजय गुप्ता यांच्यासोबत दिसल्याने राजदूताची उचलबांगडी

US News: अमेरिकेत भारतीय घरमालकाची विकृत मागणी, महिलेचा नकार अन् पुढे जे घडले ते धक्कादायक; न्याय विभागाची कठोर कारवाई
4

US News: अमेरिकेत भारतीय घरमालकाची विकृत मागणी, महिलेचा नकार अन् पुढे जे घडले ते धक्कादायक; न्याय विभागाची कठोर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.