पुतिन यांचा संताप अनावर! अमेरिकेच्या धमकीनंतर 'या' क्षेपणास्त्राच्या तैनातीवर घेतला मोठा निर्णय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia America Relations : मॉस्को : रशिया (Russia) आणि अमेरिकेतील (America) तणावात वाढ होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी रशियाच्या किनाऱ्यावर अणु पाणबुड्या तैनात करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान यामुळे रशियामध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी देखील एक मोठा निर्णय घेतल आहे.
द न्यूयॉर्क टाइम्स वृत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, रशिया सद्या मिडीयम रेंजच्या क्षेपणास्त्रांना तैनात करण्याच्या तयारीत आहे. नुकतेच रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने घोषणा केली आहे की, रशिया क्षेपणास्त्र तैनातीवरील बंदी मोडत आहेत. गेल्या अनेक काळापासून रशियावर कडक निर्बंध लादण्यात आले होते, मात्र अमेरिकेने रशियाने अनेक निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता रशियाने ते कोणताही नियम पाळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात, मिडियम आणि कमी रेंजच्या क्षेपणास्त्रांच्या तैनातीवर आता रशिया वचनबद्ध नाही. यावरुन रशियाने आता या क्षेपणास्त्रांना तैनात करणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. यापूर्वी देखील पुतिन यांनी २०२४ मध्ये रशिया उत्तरार्धात बेलारुसमध्ये क्षेपणास्त्र तैनात करणार असल्याचे संकेत दिले होते. दरम्यान पुन्हा एकदा रशियाकडून क्षेपणास्त्रांच्या तैनातीचे संकेत मिळाले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत.
काय म्हणाले होते ट्रम्प ?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी हा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) रशियावर चारी बाजूंनी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी रशियाच्या समुद्रकिनारी अणु पाणबुड्या तैनात करण्याचे आदेश दिले होते. यावर रशियाने देखील अमेरिकेच्या पाणबुड्या त्यांच्या लक्ष्यावर असल्याचा इशारा दिला होता.
ट्रम्प यांनी रशियाचे सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्या विधानानंतर हा निर्णय घेतला होता.त्यांच्या विधानाला त्यांनी युद्धासाठी भडकवणारे विधान म्हणून संबोधले होते.
FAQs (संबंधित प्रश्न)
काय आहे रशिया आणि अमेरिकेतील वादाचे कारण?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला रशिया-युक्रेन (Russia and Ukraine war) युद्ध थांबवण्याचा अल्टीमेटम दिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे युद्ध सुरु असून थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. या कारणामुळे अमेरिका आणि रशिया संबंधांमध्ये तणाव वाढत आहे.
रशिया आणि अमेरिकेत युद्ध झाल्यास काय परिणाम होईल?
रशिया आणि अमेरिका युद्धाचा जागतिक स्तरावर परिणाम होणार आहे. यामुळे भारतासारख्या अनेक मोठ्या देशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.यामुळे जगभरातील शेअर बाजार ढासळण्याची, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मित्राला नजरकैद; ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?