Putin's bodyguard carrying 'poop suitcase' in Alaska during Trump visit
Vladimir Putin News in marathi : मॉस्को : सध्या रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले आहेत. अलास्कामधील अमेरिकेच्या (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांच्या संबंधीच्या चर्चांना जास्तच उधाण आले आहे. कोणी त्यांच्या खास विमानाची चर्चा करत आहे, तर कोणी बैठकीला पुतिनचा क्लोन गेला होता असे म्हटले जात आहे.
आता आणखी एका गोष्टीच्या चर्चेला उधाण आले आहे. ही गोष्ट जरा जास्तच विचित्र आहे. म्हटले जात आहे की, पुतिन यांचे बॉडीगार्ड त्यांच्यासोबत एक खास सुटकेस घेऊन गेले होते. या सुटकेसला “पूप सुटकेस’ म्हटले जाते.
Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ
पुतिन यांची ट्रम्पसोबतची चर्चा जवळपास तीन तास सुरु होती. 2007 नंतर पुतिन प्रथमच अमेरिकेत विशेष म्हणजे अलास्कामध्ये गेले होते. अलास्का हा पूर्वी रशियाचा भाग होता. या भेटीनंतर अनेक राजकीय मुद्यांना आणि रशिया युक्रेन युद्धांवर चर्चा सुरू होते. तसेच यामुळे या संदर्भातील इतर अनेक गोष्टीही सर्वत्र चर्चचा विषय बनल्या आहेत. आता आपण ही “पूप सुटकेस” नक्की काय आहे आणि पुतिनचे बॉडीगार्ड ही सुटकेस सगळीकडे का घेऊन जातात. हे जाणून घेणार आहोत.
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांच्या बॉडीगार्डकडे एक खास सुटकेस आहे. यामध्ये पुतिन यांचा मानवी कचरा म्हणजे मलमूत्रज्ञ जमा केले जाते. यामागाचे कारण म्हणजे पुतिन कोणत्याही देशात गेल्यावर आपल्या फूटप्रिंट मागे सोडत नाहीत. मग ते ह्यूमन वेस्टही नाही. त्यांना भीती आहे की यामुळे त्यांच्या आरोग्याविषयीची माहिती परदेशी गुप्तचर संस्थाना मिळेल.
रशियाच्या फेडरल प्रोटेक्शन सर्व्हिस (FPS)ची एक खास टीम यासाठी नेमण्यात आली आहे. प्रवासावेळी पुतिन बॉडीगार्डकडे वेस्ट जमा करुन ते पुन्हा रशियात घेऊन जातात. यापूर्वीही अनेक वेळा पुतिन यांनी असे केले आहे. 2017 च्या विएना आणि फ्रान्स दौऱ्यावेळीही त्यानी पोर्टेबल टॉयलेटचा वापर केला होता.
काय आहे कारण?
गेल्या काही काळापासून पुतिन यांच्या आरोग्यावर अनेक चर्चा होत आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन पार्किन्सनसारख्या गंभीर न्यरोलॉजिकल आजाराने ग्रस्त आहेत.यापूर्वी 2023 च्या बेलारुस राष्ट्राध्यक्षांच्या भेटीवेळी त्यांना झटका आल्याचेही वृत्त मिळाले होते. यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी शत्रू लोकांना कळू नये यासाठी 1999 पासून पुतिन यांनी ही पद्धत वापरली आहे.
तसेच तर पुतिन यांनी या सर्व दाव्यांना फेटाळून लावले आहे. परंतु माध्यमांच्या मते पुतिन यांनी कधीही कोणताही धोका पत्करलेला नाही. शिवाय रशियाचे गुप्तचर देखील एकही सुराग सोडत नाहीत असे म्हटल जाते. रशियाच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही रहस्यमयी आहेत.पण सध्या पुतिन त्यांच्या या पूप सुटकेसमुळे जगभर चर्चेचा विषय बनले आहेत.
ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO