
Qasim demands proof Imran Khan is alive alleges isolation entry ban and govt collusion
Proof of life Imran Khan : माजी पाकिस्तानी (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षिततेबाबत सध्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात चिंतेचं वातावरण आहे. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्याबाबत नेमकी माहिती न मिळाल्याने अनेक अफवा पसरत असताना, आता त्यांच्या धाकट्या मुलगा कासिम खाननेच एक गंभीर दावा पुढे करून संपूर्ण प्रकरणाला नवा वळण दिला आहे. कासिमने पाकिस्तान सरकारवर त्यांच्या वडिलांना पूर्णपणे एकांतवासात टाकून त्यांची स्थिती जाणीवपूर्वक लपवण्याचा आरोप केला आहे.
कासिम खानने गुरुवारी ट्विटरवर एक लांबलचक पोस्ट लिहून धक्कादायक माहिती दिली. त्याने स्पष्ट केलं की त्यांचे वडील ८४५ दिवसांपासून अटकेत आहेत आणि गेल्या सहा आठवडे त्यांना ‘डेथ सेल’मध्ये एकटे ठेवण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांच्या बहिणींना इम्रान खान यांना भेटू देण्यात आलेले नाही. एवढेच नाही तर कुटुंबातील कोणालाच गेल्या अनेक आठवड्यांत त्यांचा एकही फोन आला नाही. कुटुंब म्हणून त्यांच्या जिविताविषयी कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे कासिमने स्पष्टपणे सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : White House shooting: ‘चुकीला माफी नाही…’ व्हाईट हाऊसजवळील हल्ल्यांनंतर ट्रम्पचा चढला पारा; म्हटले, सर्व बायडेनची चूक
या परिस्थितीचे वर्णन करताना कासिम म्हणाला की, “ही कुठलीही सुरक्षा प्रक्रिया नाही. हा आमच्या वडिलांची खरी प्रकृती आणि त्यांची स्थिती लपवण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे. प्रवेश नाकारणे, संवादातील पूर्ण ब्लॅकआउट आणि सततच्या अडथळ्यांमुळे आम्हाला भीती वाटते की त्यांच्या सुरक्षिततेबाबत काही गंभीर बाब दडवली जात आहे.” कासिमच्या या विधानामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
Imran Khan’s son Kasim Khan accuses Pakistan’s government of holding the former prime minister in secretive solitary confinement, denying family access and proof of life, and urges global pressure to end what he calls inhumane, politically-driven isolation. Read more:… pic.twitter.com/LRCUqhBaWU — IndiaToday (@IndiaToday) November 28, 2025
credit : social media
पुढे बोलताना त्याने सरकारला थेट जबाबदार धरले. “जर माझ्या वडिलांना काही झाले, तर त्याची पूर्ण कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी पाकिस्तान सरकारची असेल,” असे तो म्हणाला. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय समुदाय, मानवाधिकार संघटना आणि जगभरातील लोकशाही विचारसरणी असलेल्या संस्थांना त्वरित हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. इम्रान खान यांच्या सुरक्षिततेबाबत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचा आरोप करत, त्यांनी जागतिक दबाव निर्माण करून सरकारकडून स्पष्ट पुरावा मागण्याची विनंती केली.
दरम्यान, अदियाला तुरुंग प्रशासनाने इम्रान खान यांच्या प्रकृतीविषयीच्या अफवांचे खंडन केले आहे आणि ते सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. मात्र कुटुंबालाच भेटण्याची परवानगी नसल्याने या आश्वासनांवरील विश्वास कमी होत चालला आहे. त्यांच्या बहिणींना तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना सतत प्रवेश नाकारला जात असल्याने इम्रान खान यांच्या आजारपणाबाबत किंवा त्यांच्या स्थितीबाबत निर्माण झालेला संशय आणखी गडद होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Radar Proof : युद्धाच्या पार्शवभूमीवर ड्रॅगनचा आश्चर्यकारक दावा; लुफा तंत्रज्ञानामुळे गुप्तचर विमान होऊ शकते पूर्णपणे ‘अदृश्य’
क्रिकेटपटूपासून राजकारण्यापर्यंतच्या प्रवासात इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु २०२३ मध्ये अटकेनंतर ते सातत्याने राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांच्या समर्थकांमध्येही त्यांची प्रकृती आणि सुरक्षिततेबाबत मोठी चिंता आहे. सोशल मीडियावर ‘इम्रान खान जिवंत आहेत का?’ हा प्रश्न ट्रेंड होत असून, सरकारकडून पारदर्शकता नसल्याची टीका केली जात आहे. या सर्व घटनांमुळे पाकिस्तानच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. कासिमच्या आरोपांमुळे सरकारवर दडपण आणखी वाढले असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणात नवी घडामोड होण्याची शक्यता आहे.
Ans: कारण त्यांच्या कुटुंबाला गेल्या अनेक आठवड्यांपासून भेट किंवा कॉलची परवानगी नाही.
Ans: इम्रान खान यांना एकांतवासात ठेवून त्यांच्या स्थितीची माहिती जाणीवपूर्वक लपवण्याचा.
Ans: त्यांनी इम्रान खान सुरक्षित असल्याचा दावा केला, परंतु भेटीवरील बंदीमुळे संशय कायम आहे.