Ronald Reagan signed California's no-fault divorce law lead to increased in divorce cases in 1970
वॉशिंग्टन: सध्या बॉलीवूड स्टार गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्या घटस्फोटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. दरवर्षी संपूर्ण जगभरात हजार जोडप्यांपैकी सरासरी दोन जोडप्यांचा घटस्फोट होतो. विशेषत: 1970 च्या दशकात अमेरिका हा घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणासाठी प्रसिद्ध होता. यामागचे कारण म्हणजे त्या काळाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारे घटस्फोटाच्या कायद्यात बदल केला होता.
रोनाल्ड रीगन आणि त्यांचा निर्णय
रोनाल्ड रीगन हे अमेरिकेचे 40वे राष्ट्राध्यक्ष होते. 1981 मद्ये त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली पण त्यापूर्वी रीगन कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. 1959 मध्ये त्यांनी ऐतिहासित आदेश जारी करत घटस्फोट घेण्यासाठी पती-पत्नीपैकी कोणालाही कोणतेही ठोस कारण देण्याची आवश्यकता राहणार नाही. असे म्हटले जाते त्यांच्या या निर्णयानंतर अमेरिकेत घटस्फोटांचा पूर आला होता.
पत्नीला कंटाळून घेतला निर्णय
हा निर्णय रीगन यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या अनुभवावरुन घेतला होता. 1940 मध्ये रोनाल्ड रीगन यंनी प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री जेन वायमनसोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही. त्यानंतर 1948 मध्ये त्यांची पत्नी जेन वायमन यांनी रीगन यांच्यावर मानसिक क्रूरतेचा आरोप करुन घटस्फोट घेतला होता. हा आरोप रीगन यांना अन्याकारक वाटला आणि त्यांनी याला कठोर विरोध केला. याच अनुभवाच्या पार्श्वभूमीवर रीगन यांनी गव्हर्नर झाल्यानंतर घटस्फोट घेण्यासाठी कोणतेही ठोस कारण देण्याची गरज नाही असा कायदा लागू केला.
घटस्फोटांचा पूर
रोनाल्ड रीगन यांच्या या निर्णयानंतर अमेरिका आणि संपूर्ण जगात घटस्फोटाचे प्रमाण वाढले होते. नेशनल अफेयर्स मॅगझीननेमध्ये डब्लू. ब्रॅडफोर्ड विलकॉक्स यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार, 1960 ते 1980 च्या काळात अमेरिकेत घटस्फोटाची संख्या दुप्पट झाली होती. त्यापूर्वी दर हजार जोडप्यांमागे 9 जोडपी घटस्फोट घेत होते, मात्र या नव्या कायद्यामुळे ही संख्या 22 पेक्षा जास्त वाढली होती.
नियमानंतर झालेला मोठा परिणाम
रीगन यांच्या या निर्णयानंतर लाखो मुले त्यांच्या आई-वडिलांच्या विभक्त होण्यामुळे मानसिक तणावाखाली आली. अनेक कुटुंबे तुटली आणि समाजावर याचा खोल परिणाम झाला. या कायद्यावर जगभरातून टीका वाढली, तेव्हा रीगन यांनी यावर सार्वजनिकपणे खेद व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, या कायद्याचा उद्देश वेगळा होता, मात्र त्याचे परिणाम असे होतील याचा विचार मी केला नव्हता. या घटनेने सिद्ध केले होते की, अनेकदा एखादा निर्णय वैयक्तिक आधारावर घेतला जातो मात्र, त्याचा संपूर्ण समाजावर परिणा होतो.