Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-America International Relations: अमेरिका-रशिया युद्धाच्या उंबरठ्यावर…; पुतिन-ट्रम्प यांच्यात शाब्दिक चकमक

अमेरिकेने रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर, रोझनेफ्ट आणि ल्युकोइल यांच्यावर नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. या कंपन्या अनुक्रमे सरकारी आणि खाजगी मालकीच्या असून, तेल शोध, शुद्धीकरण आणि विक्रीमध्ये कार्यरत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 24, 2025 | 03:42 PM
Russia-America International Relations:

Russia-America International Relations:

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील प्रस्तावित बैठक रद्द
  • ट्रम्प यांची सुरुवातीला रशियाशी चांगले संबंध निर्माण करण्याची इच्छा
  • रशियन तेलावरील निर्बंधांमुळे तेलाचा पुरवठा कमी होईल
Russia-America International Relations: “रशियावर अमेरिकेच्या टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला तर रशियाकडूनही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. पण संघर्ष किंवा कोणत्याही वादापेक्षा संवाद नेहमीच चांगला असतो. आम्ही नेहमीच संवाद सुरू ठेवण्यासाठी समर्थन केले आहे.” अशी प्रतिक्रीया रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली आहे. अमेरिकेने रशियाच्या दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर पुतिन यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.

२२ ऑक्टोबर रोजी ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील प्रस्तावित बैठक रद्द झाल्यानंतर अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लादले. हे निर्बंध रशिया-युक्रेन युद्ध थांबण्यासाठी लादण्यात आल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. पण पुतिन यांनी ट्रम्पच्या या निर्णयावर टीका करत त्यांच्या या निर्बंधांमुळे अमेरिका-रशिया संबंध बिघडू शकतात, याकडे लक्ष वेधले. ट्रम्प सुरुवातीला रशियाशी चांगले संबंध निर्माण करू इच्छित होते. परंतु युक्रेनसोबत सुरू असलेले युद्ध थांबवण्यास वारंवार नकार दिल्याबद्दल ते पुतिन यांच्यावर नाराज होते.

India-China News: भारतासाठी धोक्याची घंटा; चीन सीमारेषेवर लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमानांसाठी हॅंगरची उभारणी

अमेरिकेच्या निर्बंधांमुळे तेलाच्या किमती वाढतील- पुतिन

पुतिन म्हणाले की, “रशियन तेलावरील निर्बंधांमुळे तेलाचा पुरवठा कमी होईल. त्यामुळे जगभरातील तेलाच्या किमती वाढतील. तेलाच्या किमती केवळ रशियामध्येच नव्हे तर अमेरिकेत आणि जगभरात वाढू शकतात.

२ रशियन कंपन्या आणि ३६ उपकंपन्यांवर निर्बंध

अमेरिकेने रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर, रोझनेफ्ट आणि ल्युकोइल यांच्यावर नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. या कंपन्या अनुक्रमे सरकारी आणि खाजगी मालकीच्या असून, तेल शोध, शुद्धीकरण आणि विक्रीमध्ये कार्यरत आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या ३६ उपकंपन्यांवरही निर्बंध लागू होणार आहेत. या उपकंपन्यांमध्ये रोझनेफ्ट किंवा ल्युकोइलचा ५० टक्क्यांहून अधिक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिस्सा आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, या दोन्ही कंपन्या रशियाच्या कच्च्या तेल निर्यातीपैकी जवळपास निम्मा हिस्सा सांभाळतात. त्यामुळे या निर्बंधांमुळे जागतिक तेलाच्या किमतीत सुमारे ५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासोबतच, युरोपियन युनियनने रशियन एलएनजी गॅस आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने ऊर्जा बाजारावर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे.

America-Russia Relation: ‘6 महिन्यात दाखवून देऊ…’; रशियावर लादलेल्या निर्बंधांवर डोनाल्ड ट्रम्प यांचा खुला इशारा

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने २१ नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे. उर्वरित कंपन्यांना २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत रोझनेफ्ट आणि ल्युकोइलसोबतचे सर्व व्यवहार संपवण्याची मुदत दिली आहे. या आदेशाचे पालन न केल्यास दंड, काळ्या यादीत समावेश किंवा व्यापार निर्बंध अशा कारवायांचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि रोझनेफ्ट यांच्यात दीर्घकालीन व्यावसायिक संबंध आहेत. रिलायन्स ही रशियाकडून भारताकडे होणाऱ्या कच्च्या तेल आयातीतील सर्वात मोठी खरेदीदार कंपनी आहे. रिलायन्सने डिसेंबर २०२४ मध्ये रोझनेफ्टसोबत २५ वर्षांचा करार केला असून, त्यानुसार ती दररोज ५००,००० बॅरल (वार्षिक २५ दशलक्ष टन) कच्चे तेल आयात करणार आहे. या कराराची किंमत अंदाजे वार्षिक १२ ते १३ अब्ज डॉलर्स एवढी आहे.

Web Title: Russia america international relations america russia on the brink of war verbal clash between putin trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news
  • Russia
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

Marco Rubio : निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्पचे खास मार्को रुबियो देणार राजीनामा? व्हाईट हाऊसचे मोठे स्पष्टीकरण
1

Marco Rubio : निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्पचे खास मार्को रुबियो देणार राजीनामा? व्हाईट हाऊसचे मोठे स्पष्टीकरण

US Midterms :  कोण आहेत हरमीत ढिल्लन? ट्रम्प यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा; अमेरिकेत राजकीय गदारोळ
2

US Midterms : कोण आहेत हरमीत ढिल्लन? ट्रम्प यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा; अमेरिकेत राजकीय गदारोळ

Los Angeles : ‘लज्जास्पद…’ लॉस एंजेलिसमधील पराभवांनंतर ट्रम्प संतापले; भारतीय वंशाच्या नित्या रमण यांचा ऐतिहासिक विजय
3

Los Angeles : ‘लज्जास्पद…’ लॉस एंजेलिसमधील पराभवांनंतर ट्रम्प संतापले; भारतीय वंशाच्या नित्या रमण यांचा ऐतिहासिक विजय

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळचा संघर्ष तीव्र: सतेज पाटलांचा आक्रमक; आज काय घडणार?
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळचा संघर्ष तीव्र: सतेज पाटलांचा आक्रमक; आज काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.