
Russia Ukriane War
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनवर २९३ ड्रोन आणि १८ घातक बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा केला आहे. रशियाच्या या हल्ल्यामुळे युक्रेनची राजधानी कीवसह, खार्किव, ओडेसा, आणि इतर काही मुख्य शहरांमध्ये दहशत पसरली आहे. या हल्ल्यात ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून अनेकजण जखमी झाले आहेत. याची पुष्टी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
रशियाच्या लष्कराने या करावईमध्ये इस्कंदर-एम बॅलेस्टिक मिसाइलचा आणि इराणनिर्मित शाहेद ड्रोन्सचा वापरल केला आहे. अवघ्या काही तासांतच रशियाने ड्रोन्स आणि मिसाइलचा मारा करत युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेला झटका दिला आहे. दरम्यान युक्रेनने २४० ड्रोन्स हाणून पाडल्याचा दावा केला आहे. परंतु तरीही युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनच्या खार्किव शहरात एका टर्मिनलवर हल्ला झाला होता, ज्यामध्ये चार जणांचा बळी गेला आहे. ओडेसा बंदर शहरातही प्रचंड हल्ले करण्यात आले आहेत.
दरम्यान रशियाच्या या हल्ल्याचा सर्वाधिक परिणाम युक्रेनच्या उर्जा व्यवस्थेवर झाला आहे. राजधानी कीव आणि आसपासचा भागातील उर्जा प्रकल्प उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक इमारतींना आग लागली आहे. अनेक ठीकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे. दळवळण सेवांवर मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान रशियाच्या या हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र निषेध केला जात आहे. या हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्रांमध्ये आणि अमेरिकेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. रशियाच्या या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. उर्जा सुविधांवरील हल्ले मानवी संकट वाढवत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. सध्या ट्रम्प इराण (Iran) सोबतच्या तणावात गुंतले असाताना रशियाने हा हल्ला केला आहे. रशिया जागतिक राजकारणातील तणावाचा फायदा घेत युक्रेनवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याचा रशियाने घेतला बदला; युक्रेनमध्ये तीव्र ड्रोन अन् बॉम्ब हल्ले
Ans: रशियाने युक्रेनवर सुमारे २९३ ड्रोन्स अन् १८ घातक बॅलेस्टिक मारा केला आहे.
Ans: रशियाच्या हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने तीव्र विरोध केला आहे. अमेरिकेने युक्रेनच्या पायाभूत सुविधांवरली हल्ला हा मानवी संकटाची चाहून असल्याचे म्हटले आहे.