Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukriane War : युक्रेन पुन्हा जळाले! झेलेन्स्कींच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच रशियाचा हल्ला; राजधानी कीव्हमध्ये भीषण विध्वंस

Russia-Ukriane War : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा चिघळले आहे. नुकतेच रशियाने युक्रेनच्या राजधानी कीव्हवर भीषण प्रहार केला असून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा मारा केला आहे. या हल्ल्यांचे संकेत युक्रेनच्या गुप्तचर संस्थेला आधीच मिळाले होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2026 | 09:35 AM
Russia attack on Ukriane

Russia attack on Ukriane

Follow Us
Follow Us:
  • रशियाचा कीव्हवर भीषण हल्ला
  • झेलेन्स्कींनी आधीच दिला होता इशारा
  • हॉटेलसह अनेक इमारतींना आग
Russia-Ukriane War News in Marathi : मॉस्को/कीव्ह : गेल्या चार वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले रशिया युक्रेन युद्ध काही थांबण्याचे नाव घेईना. गुरुवारी (०२ जुलै) पहाटे रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर भीषण मिसाइल हल्ला केला. संपूर्ण शहर झोपेत असताना रशियाने डझनभर ड्रोन्स आणि बॅलेस्टिक मिसाइल्स कीव्हच्या दिशेने डागली.

या हल्ल्यामुळे कीव्हमध्ये अनेक ठिकाणी हॉटेल, व्यावसायिक इमारती आणि इतर बांधकाम भागांना आग लागली आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक म्हणजे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच रशियाकडून मोठ्या हल्ल्याची भीती व्यक्त केली होती.

Birthright Citizenship : ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अमेरिकन कोर्टाने ठरवला बेकायदेशीर; भारतीयांची होणार चांदी

या भागाला सर्वाधिक फटका

मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्याचा सर्वाधिक फटका शेवचेन्किव्स्की भागाला बसला आहे.स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन इमारतींवर थेट कोसळल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली होती. सुदैवाने या इमारतीत कोणी नागरिक वास्तव्यास नव्हते यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनास्थळी आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. तसेच याच परिसरात आणखी एका हॉटेलवर ड्रोन कोसळल्याने आग लागल्याचीही माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांनंतर परिसरात घबराट पसरली आहे. सरकारने नागरिकांना तातडीने सुरक्षा बंकर आणि शेल्टरमध्ये जाण्याचे आवाहन  केले आहे.

Russian drone strikes City Hotel Residence in Kyiv, Ukraine. This footage was geolocated/verified by @zarGEOINT. pic.twitter.com/38gIQWTlTf — Open Source Intel (@Osint613) July 1, 2026

बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा भीषण हल्ला

ड्रोन हल्ल्याच्या काही वेळातच रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही मारा केला. रशियाने एकाच वेळी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वेगवेगळ्या दिशेने डागली होती. येत्या काही दिवसांत असे हल्ले अधिक होण्याची शक्यताही सरकारने व्यक्त केली आहे.

झेलेन्स्कींनी आधीच दिला होता इशारा

राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आयर्लंड दौऱ्यादरम्यान युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांना रशियाकडून मोठ्या हल्ल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले होते. झेलेन्स्कींच्या मते, हे हल्ले आधीपासूनच नियोजत होते. त्यांनी म्हटले, या सततच्या हल्ल्यांवरुन रशियाला युद्ध संपवायचे नसल्याचे स्पष्ट होते.

सध्या रशियाच्या या हल्ल्यामुळे किती जीवितहानी झाली याची माहिती अद्याप युक्रेन सरकारने जारी केलेली नाही. मात्र, यामुळे कीव्हचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे. सध्या संभाव्य हल्ल्यांना रोखण्यासाठी युक्रेनच्या हवाई यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Kyiv city has been hell for a few hours now. – 13 cruise missiles have struck the city
– Several Geran-3/4/5
– Several ballistic missiles
– The lack of air defense is real sadly
Attack is not over pic.twitter.com/oGpsCWDl71 — kim høvik (@kimhvik2) July 2, 2026


Helicopter Crash : अमेरिकन लष्कराचे MH60 हेलिकॉप्टर क्रॅश; आपत्कालीन लँडिंग करताना झाला अपघात

Web Title: Russia attcked kyiv zelensky warning missile drone strike russia ukriane war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.