Birthright Citizenship : ट्रम्प यांचा 'तो' निर्णय अमेरिकन कोर्टाने ठरवला बेकायदेशीर; भारतीयांची होणार चांदी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातील तात्पुरत्या व्हिसा आणि बेकायदेशीर अमेरिकेत राहणऱ्यांना हद्दपार करण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. बेकायदेशीरपणे राहणाऱ्या कुटुंबांच्या जन्मजात मुलांना अमेरिकेचे जन्मताच नागरिकत्व नाकारले होते.
यासाठी त्यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. मात्र, ट्रम्प यांचा हा निर्णय आता असंवैधानिक ठरवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचा निर्णय अमेरिकेच्या संविधानातील १४ व्या दुरुस्तीतील नागरिकांच्या तरतुदीं विरोधात असल्याचे म्हटले. यामुळे अमेरिकेतील भारतीयांना याचा मोठा फायदा होणार आहे.
सध्या अमेरिकेत सुमारे ३० लाख भारतीय राहतात. यामध्ये एच-१बी, एल-१, एफ-१ व्हिसाधारक, ग्रीड कार्डची प्रतिक्षा करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ग्रीनकार्ड मिळायला अनेक वर्षे जातात. ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाने मुलांच्या नागरिकत्वाबाबतही गोंधळ निर्माण झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.






