Russia denies India appeal for selling Pakistan fighter jet jf-17 engine
Pakistan Russia Relations : मॉस्को : भारत आणि रशियाचे (Russia) संबंध गेल्या अनेक काळापासून मजबूत राहिले आहेत. परंतु रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) अजूनही भारताच्या एका महत्त्वाच्या विनंतीला सहमत झालेले नाहीत. भारताने रशियाला एक महत्त्वपूर्ण विनंती केली होती. पाकिस्तानला JF-17 फायटर जेटसाठी इंजिनचा पुरवठा न करण्याची विनंती केली होती. परंतु रशियाने भारताचा हा प्रस्ताव नाकारला आहे. डिफेन्स सिक्युरिटी एशियाच्या अहवालानुसार रशियाने पाकिस्तानला इंजिन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान (Pakistan) हवाई दल सध्या आपली शस्त्रास्त्र ताकद वाढवण्यासाठी चीनवर अवलंबून आहे. चीन आजही पाकिस्तानला लढाऊ विमाने आणि शस्त्रास्त्रे पुरवतो. शिवाय मुस्लिम देश तुर्कीकडूनही पाकिस्तानला मदत मिळते. पण आता यामध्ये रशियाही पाकिस्तानच्या बाजूने उभा राहताना दिसत आहे. भारताच्या दृष्टीकोनातून रशियाची ही कृती दुहेरी खेळी आहे. एककीडे रशिया भारताशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न करत, तर दुसरीकडे भारताच्या शत्रू देश पाकिस्तानला समर्थन करतो. यामुळे याकडे रशियाच्या धोरणातील गुंतागुंत म्हणून पाहिले जात आहे.
JF-17 लढाऊ विमान हे ४.५ पिढीचे आहे. या विमानाचे ब्लाक I आणि ब्लॉक II मॉडेल आहे.पण यांचे सामर्थ खूप कमी आहे. आता चीन-पाकिस्तान या लढाऊ विमानाचे ब्लॉक III तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे रशियाचे इंजिन यासाठी अत्यंत महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानच्या हवाई ताकदीत वाढ होईल. शिवाय रशिया आणि चीनचेही संबंध चांगले असल्याचे पाकिस्तान-रशिया-चीन अशी त्रिकुट तयार होण्याची शक्यात आहे. मात्र यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
चीन आणि पाकिस्तान संबंध घनिष्ठ आहेत. भारताविरुद्धच्या लढाईत चीनने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत केली होती. पाकिस्तानची बहुतेक शस्त्रास्त्रे आणि फायटर जेट्स ही चीनकडून खरेदी केलेली आहेत. आता यामध्ये रशियाही सामील होत असल्याने भारताच्या सुरक्षा रणनितीसमोर अनेक मोठी आव्हाने निर्माण होणार आहेत. रशियाच्या पाकिस्तानला JF-17 इंजिन पुरवण्याचा निर्णयामुळे भारताला आपल्या संरक्षण धोरणात बदल करण्याची गरज आहे. भारताच्या संरक्षणासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रश्न १. भारताने रशियाला काय विनंती केली होती?
भारताने रशियाला JF-17 लढाऊ विमानासाठी इंजिन पुरवठा न करण्याची विनंती केली होती.
प्रश्न २. रशियाने भारताच्या विनंतीला काय प्रतिसाद दिला?
रशियाने भारताच्या विनंतीला नकार देत, पाकिस्तानला JF-17 लढाऊ विमानासाठी इंजिन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.