सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; 'Salesman' म्हणत त्यांच्या देशातील खासदाराने केली तीव्र टीका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नुकतेच पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली होती. कारण या भेटीत मुनीर यांना ट्रम्प यांना बलुचिस्तानमध्ये सापडलेल्या मौल्यवान खनिजे दाखवली होती. यामध्ये बॅस्टेझेनाइट, मोनाझाइट, यांसारखी खनिजे होती. याचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
यामुळे शरीफ आणि मुनीर यांना पाकिस्तानमध्ये मोठा अपमान सहन करावा लागत आहे. पाकिस्तान खासदार ऐमल वली खान असीम मुनीर यांच्या भेटीवर टीका केली आहे. त्यांनी मुनीर यांना सेल्समॅन म्हणून संबोधले आहे. पाकिस्तानी खासदार ऐमल वली खान यांनी मुनीर यांच्यावर टीका करत संसदेत प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुनीर यांनी कोणत्या आधारावर आणि कोणत्या क्षमतांवर ट्रम्प यांना पाकिस्तानची दुर्मिळ खनिजे भेट दिली. हा गोंधळ ट्रम्प आणि मुनीर यांच्या दुर्मिळ खनिजे दाखवणाऱ्या फोटोनंतर सुरु झाला आहे. ऐमल वली खान यांनी म्हटले की, ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान असीम मुनीर एका सेल्समॅन सारखे दिसत होते. त्यांनी फसवणूक करुन ट्रम्प यांना पाकिस्तानचा मौल्यवान खजिना विकण्याचा प्रयत्न करत होते, असे खान यांनी म्हटले.
त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावरही टीका केली. खान यांनी म्हटले की, शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) काय केवळ नाटक पाहत उभे होते. त्यांनी म्हटले की, मुनीर परदेशात प्रवेश करत आहेत, राजनैतिक बैठक घेत आहेत. पण ही आपल्या देशाची आणि संविधानाची थट्टा आहे. याला लोकशाही म्हणत नाहीत. पाकिस्तानमध्ये हुकूमशाही असून संसदेचा अपमान आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचा अपमान कोणी केला?
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर पाकिस्तानचे खासदार ऐमल वली खान यांनी तीव्र टीका केली आहे.
प्रश्न २. पाकिस्तानी खासदार ऐमल वली खान यांनी असीम मुनीर यांच्यावर काय भाष्य केले?
पाकिस्तानी खासदार ऐमल वली खान यांनी असीम मुनीर यांना सेल्समॅन म्हटले. त्यांनी त्यांच्या ट्रम्प यांच्याशी भेटीवरुन भाष्य केले. कोणत्या अधिकाराने ट्रम्प यांना असीम मुनीर यांनी पाकिस्तानचा मौल्यवान खजिना यदाखवत होते असे म्हटले.
पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली






