ट्रम्प यांना मोठा धक्का! हमासकडून प्रस्ताव मान्य होण्यापूर्वीच इस्रायलची कारवाई ; दक्षिण गाझा रिकामा करण्याचे पॅलेस्टिनींना आदेश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Hamas War : सोमवारी (२९ सप्टेंबर) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास युद्ध संपवण्यासाठी प्रस्ताव मानला होता. या प्रस्तावाला इस्रायलने पाठिंबा दिला होता. तर हमासने यावर विचार करावा लागेल असे म्हटले होते. यामुळे हमासला ट्रम्प यांनी प्रस्तावावर प्रतिसाद देण्यासाठी तीन-चार दिवसांची मुदत दिली होती. तसेच त्यांनी योजना अंमलात आली नाही, तर याचे गंभीर परिणा भोगावे लागतील असे म्हटले होते. दरम्यान हमासकडून ट्रम्प यांच्या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद येण्यापूर्वी गाझात मोठी खळबळ उडाली आहे.
इस्रायलने दक्षिण गाझातील लोकांना शहरे रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांच्या शांतता प्रस्तावाला मान्यता मिळण्यापूर्वीच इस्रायलने गाझात कारवाई सुरु केली आहे. बफर झोन रिकामा केला जात आहे. यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. याच वेळी इस्रायलवरही गाझातून हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्या काळी उत्तरी गाझातून दक्षिण इस्रायलच्या अश्दोद शहरावर रॉकेट्स डागण्यात आले आहेत. इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने चारही रॉकेट्स हवेतच उडवून लावली आहेत. यामुळे या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सर्वांचा गोंळध उडाला आहे.
‘शांतता करार स्वीकारा नाहीतर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा योजनेवर हमासला कडक इशारा
हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा इस्रायल आपल्या यहूदी कॅलेंडरचा सर्वात परिवत्र सण योम किप्पुर साजरा करत आहे. या सणाच्या आधीच हा हल्ला झाल्या इस्रायलमध्ये सर्व काही ठप्प झाले आहेत. आज रात्रीपर्यंत सर्व दुकाने, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे आणि सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, सर्व प्रसारमांध्यमांनी देखील प्रसारण थांबवले आहे. वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. तसेच वैद्यकीय आणबाणीची परिस्थिती उद्भवली आहे.
याच वेळी इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्ज यांनी सांगितले की, त्यांच्या सैन्याने नेत्झारिम कॉरिडॉरवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. हा कॉरिडर मध्य गाझातील बफर झोन म्हणून कार्य करतो. गाझा शहर व उत्तरी गाझा यांना एन्क्लेवपासून वेगळे करण्यासाठी इस्रायलने कारवाई सुरु केली आहे. काट्ज यांनी चेतावणी दिली की दक्षिण गाझाकडे जाण्याचा कोणीही विचार करत असेल, त्यासाठी ही शेवटची संधी आहे. यानंतर गाझात राहणाऱ्या लोकांना दहशतवादी किंवा हमासचे समर्थक मानले जाईल.
इस्रायलच्या संरक्षण दलाने गाझात शहरात जमिनीमार्गेही कारवाई सुरु केली आहे. हमासच्या दहशतवाद्यांना ठार केले जात असल्याचे आणि त्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली जात असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. पण इस्रायलच्या या कारवाईमुळे गाझातील नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे.
प्रश्न १. ट्रम्प यांना गाझा प्रस्ताव मान्य करण्यासाठी हमासला किती दिवसांची मुदत दिली होती?
डोनाल्ड ट्रम्प यांना हमासला गाझा शांतता योजना मान्य करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती.
प्रश्न २. इस्रायलने गाझातील लोकांना काय आदेश दिले?
इस्रायलने गाझातील लोकांना दक्षिण भाग रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत?
प्रश्न ३. इस्रायलने कोणत्या भागात कारवाई सुरु केली आहे?
इस्रायलने नेत्झारिम कॉरिडॉरवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. हा कॉरिडर मध्य गाझातील बफर झोन म्हणून कार्य करतो. गाझा शहर व उत्तरी गाझा यांना एन्क्लेवपासून वेगळे करण्यासाठी इस्रायलने कारवाई सुरु केली आहे.