Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Iran मध्ये नेमकं शिजतंय काय? पुतिन-पेझेश्यियान यांच्यात हॉटलाईनवर गुप्त चर्चा; ट्रम्प-नेतन्याहूंचे टेन्शन वाढलं

Putin Pezeshkian Phone Call : एकीकडे अमेरिकेशी तणावादरम्यान इराणचे रशियाशी मैत्री अधिक घट्ट होत आहे. गेल्या महिन्याभरात इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांच्याशी तीन वेळा गुप्त चर्चा केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 25, 2026 | 01:35 PM
Putin Pezeshkian Hotline Discussio rises concern in Trump-Netanyahu

Putin Pezeshkian Hotline Discussio rises concern in Trump-Netanyahu

Follow Us
Follow Us:
  • रशिया इराणची जवळीक वाढतेय
  • ५६ दिवसांत ३ वेळा पुति-पेझेश्कियान यांच्यात गुप्त चर्चा
  • ट्रम्प-नेतन्याहूंच टेन्शनं वाढलं
Putin Pezeshkian Hotline Discussion : मॉस्को/तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एका बाजूला रशिया आणि इराणमधील मैत्री अधिक घट्ट होत आहे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणची आर्थिक नाकेबंदी केली आहे. अमेरिकेने स्ट्रेट ऑफ होर्मुझवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. यामुळे सध्या जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

US Iran Conflict : ट्रम्प यांचा दुहेरी खेळ! इराणजवळ अमेरिकेची तिसरी घातक युद्धनौका तैनात, शांतता चर्चेआड मोठा गेम प्लॅन?

पुतिन-पेझेश्कियान यांच्यात चर्चा

रशियातील इराणी राजदूत काजम जलाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर केलेल्या कारवाईनंतर रशिया आणि इराणमधील संबंधांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या ५६ दिवसांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी तीन वेळा हॉटलाईनवर संवाद साधला आहे. १२ एप्रिल रोजी त्यांची शेवटची चर्चा झाली होती. या चर्चेत दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्रीही समील झाले होते. ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. परंतु नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र रशिया (Russia) पश्चिम आशिया युद्धात मध्यस्थीची भूमिका बजावण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांचा इराणवर आर्थिक स्ट्राइक

याच वेळी ट्रम्प यांनी इराणच्या आर्थिक नसेवर आघात केला आहे. अमेरिकेने जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाचा असलेला मार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) वर नियंत्रण मिळवले आहे. जोपर्यंत इराण अटी मान्य करत नाही, शांतता करार होत नाही तोपर्यंत अमेरिकेचे होर्मुझवर नियंत्रण राहिल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याशिवाय इराणी जहाजांची नाकेबंदीही अमेरिकेने सुरुच ठेवली आहे.

ट्रम्प यांच्या मते होर्मुझ मार्ग खुला केल्यास इराणला दररोज सुमारे ५०० दशलक्ष डॉलर्सची कमाई मिळेल. यामुळे इराणचा आर्थिक स्त्रोत रोखण्याचा हेतू ट्रम्प यांनी स्पष्ट केला आहे. यामुळे जागतिक बाजारात इंधनाचे दर तात्पुरते वाढतील परंतु इरणला नमतं करण्यासाठी हे आवश्यत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

शांतता चर्चेला इराणचा नकार

दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची महत्त्वाच्या दौऱ्यासाठी शुक्रवारी (२४ एप्रिल) रात्री उशिरा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, त्यांनी अमेरिकेशी शांतता चर्चांच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची थेट चर्चा होणार नसल्याचे अराघची यांनी स्पष्ट केले आहे.

Netanyahu Health Update : इस्रायली पंतप्रधानांना कॅन्सर? इराणशी तणावादरम्यान नेतन्याहूंचा खळबळजनक खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशिया आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष सतत संपर्कात का आहेत?

    Ans: अमेरिका इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराण आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष संपर्कात आहे. दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारी मजबूत झाली आहे. रशिया मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणला राजकीय पाठींबा देण्याचा प्रयत्न करत आहे.

  • Que: पुतिन-पेझेश्कियान यांच्यात किती वेळा चर्चा झाली?

    Ans: रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांच्यात ५६ दिवसांत तीनवेळा हॉटलाईनवर चर्चा झाली आहे.

  • Que: अमेरिकेने होर्मुझवर नियंत्रण का मिळवले आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या मते होर्मुझ मार्ग खुला केल्यास इराणला दररोज सुमारे ५०० दशलक्ष डॉलर्सची कमाई मिळेल. यामुळे इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेने होर्मुझवर नियंंत्रण मिळवले आहे.

Web Title: Russia iran secret talks putinpezeshkian hotline discussion rises trumpnetanyahu concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Iran News
  • Russia
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Israel Lebanon War: लेबनॉनच्या नबातीह जिल्ह्यात इस्रायलचा भीषण बॉम्बवर्षाव; 16 जणांचा मृत्यू, निवासी वस्त्यांचे रूपांतर ढिगाऱ्यात
1

Israel Lebanon War: लेबनॉनच्या नबातीह जिल्ह्यात इस्रायलचा भीषण बॉम्बवर्षाव; 16 जणांचा मृत्यू, निवासी वस्त्यांचे रूपांतर ढिगाऱ्यात

Tokyo School Fire: टोकियोत 4 मजली प्राथमिक शाळेला आग; 330 जणांची सुखरूप सुटका, 10 चिमुरडे जखमी
2

Tokyo School Fire: टोकियोत 4 मजली प्राथमिक शाळेला आग; 330 जणांची सुखरूप सुटका, 10 चिमुरडे जखमी

Times Square Firing: पर्यटकांची पळापळ अन् किंकाळ्या! टाईम्स स्क्वेअर गोळीबाराने हादरली अमेरिका; थरारक VIDEO आला समोर
3

Times Square Firing: पर्यटकांची पळापळ अन् किंकाळ्या! टाईम्स स्क्वेअर गोळीबाराने हादरली अमेरिका; थरारक VIDEO आला समोर

US-Iran Hormuz Toll: इराण-अमेरिकेचा करार झाला, पण फक्त 60 दिवसांसाठी? जहाजांच्या टोल शुल्कावर मोठा निर्णय; जगभरात चर्चा सुरू
4

US-Iran Hormuz Toll: इराण-अमेरिकेचा करार झाला, पण फक्त 60 दिवसांसाठी? जहाजांच्या टोल शुल्कावर मोठा निर्णय; जगभरात चर्चा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.