Russia is ready for a ceasefire but has put four conditions
मॉस्को: गेल्या तीन वर्षाहूंन अधिक काळ सुरु असलेल्या रशिया-यूक्रेन युद्धबंदीसाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि यूक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये 11 मार्च 2025 रोजी रशिया-यूक्रेन युद्ध थांबवण्यासाठी एक बैठक पार पडली. या बैठीकत 30 दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्तावर सादर करण्यात आला. या प्रस्तावाला यूक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सहमती दर्शवली मात्र, रशियाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान आता रशियाने अमेरिकेसमोर काही अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य केल्या तरच रशिया यूक्रेन युद्ध संपवण्यासाठी तयार होणार असल्याचे म्हटले आहे. पुतिन यांच्या या अटी जुन्या अजेंडाच्या प्रवृत्तीच्या आहेत. रशियाने स्पष्ट म्हटले आहे की, केवळ या अटी मान्य झाल्या तरच रशिया युद्धबंदीच्या प्रस्तावाला मान्यता देईल.
रशियाच्या अमेरिकेसमोर ठेवल्या या चार अटी
अमेरिकेची दुभंगलेली भूमिका
रशियाच्या या अटींमुळे अमेरिका मोठ्या अडचणीत सापडला आहे. सध्या अमेरिका दोन भांगत विभागला गेला आहे, एक म्हणजे रशिया-यूक्रेन युद्धबंदी आणि दुसरी म्हणजे अमेरिका-रशिया संबंध पुन्हा रुळावर आणणे. मात्र रशियाच्या अटी केवळ यूक्रेनपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या अमेरिका आणि युरोपच्या रणनीतीवरही परिणाम करू शकतात.
अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे की, रशिया युद्धविरामाचा उपयोग स्वतःची लष्करी ताकद वाढवण्यासाठी आणि अमेरिकेचे युरोपशी संबंध बिघडवण्यासाठी करत आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात या अटींवर असहमती निर्माण झाली आहे.
युद्धविराम होईल की ही फक्त आणखी एक खेळी?
2022 मध्येही अमेरिका काही अटी मान्य करण्यास तयार होता, पण युद्ध थांबले नाही. आता प्रश्न असा आहे की, ही नवीन वाटाघाटी वास्तवात शांततेचा मार्ग मोकळा करेल की केवळ एक नवीन राजकीय खेळी ठरेल?