यूक्रेनच्या 'या' हलचालीमुळे पुतिनची हवा टाईट; क्रेमलिनच्या अधिकाऱ्याचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले युद्धबंधीसाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केला जात आहे. दरम्यान 30 दिवसांच्या हवाई आणि नौदल युद्धाविरामाचा प्रस्ताव सौदी अरेबियाता झालेल्या रशियन अधिकारी, अमेरिकन अधिकारी आणि झेलेन्स्की यांच्या उपस्थितीत मांडण्यात आला. या प्रस्तावाला यूक्रेनने सहमती दर्शवली आहे. मात्र, रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता केवळ शस्त्रांनी लढले जात नाही, तर कूटनीतीच्या माध्यमातूनही मोठे डाव खेळले जात आहेत.
तसेच त्यांनी माध्यमांनी खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोपही केला आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी म्हटले आहे की, रशियाच्या शांती चर्चेबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. वस्तुस्थिती यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यांनी लोकांना कोणत्याही मीडिया वृत्तांवर विश्वास दिमित्री पेसकोव यांनी मंगळवारी स्पष्ट केले की रशियाच्या शांती चर्चेबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत, ज्या वस्तुस्थितीपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांनी लोकांना कोणत्याही असत्य मीडिया रिपोर्टवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आणि फक्त अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा, असे सांगितले. हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकन आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांची अरेबियात शांतता चर्चे झाली.
युक्रेनचा तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव
यूक्रेनच्या नव्या प्रस्तावानुसारन 30 दिवसांच्या कालावधीसाठी हवाई आणि समुद्री संघर्षविराण होणार आहे. परंतु क्रेमिलने हा दावा फेटाळून लावला आहे. क्रेमिनलच्या मते सध्या अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार झालेला नाही. तसेच अंतरिन शांतता कराराच्या दिशेने ठोर प्रगती झाल्यास रशिया तात्पुरत्या युद्धविरामावर चर्चा करण्यास तयार असू शकतो.
मॉस्कोमध्ये अमेरिका-रशियाची अधिकाऱ्यांची गुप्त बैठक
दरम्यान गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि यूक्रेनच्या चर्चेसोबत अमेरिकेत मध्ये पूर्वेत विशेष दूत स्टीव मास्कोला भेट देणार असल्याचे म्हटले जात आहे. यादरम्यान पुतिन यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, क्रेमलिनने या भेटीची अधिृत घोषणा मात्र केलेली नाही.
क्रेमलिनचे पाश्चात्य माध्यमांवर टीका
क्रेमलिनने पाश्चत्य माध्यमांवर टीका करत, यूरोपीय देश हेतुपुरस्सर रशियाची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. यामुळे कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत घोषणांची प्रतीक्षा करावी असे क्रेमलिनने म्हटले आहे. यावरुन स्पष्ट होते की, रशिया अमेरिकेच्या मध्यस्थिने सुरु असलेल्या कोणत्याही शांतता चर्चेविषयी सावध भूमिका घेत आहे. यावरुन यूक्रेन पुन्हा रशियाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. यूक्रेनला अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्यास पुतिन अडचणीत येण्याची शक्यता आहे.