
Russia launched 1300 drones and 1200 guided bombs launched on ukraine
रशियाचा कहर! युक्रेनच्या ओडेसा बंदरावर घातक प्रहार ; हल्ल्यात ८ जण ठार, अनेक जखमी
झेलेन्स्की यांनी एक्सवर यांसदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले की, रशिया सातत्याने तीव्र हल्ले करत आहे. गेल्या आठवड्याक रशियाने युक्रेनमध्ये तब्बल १,३०० ड्रोन्स, १,२०० ग्रेनेड बॉम्ब आणि ९ क्षेपणास्त्र डागलीआहेत. यामुळे झेलेन्स्की संतप्त झाले आहेत. त्यांनी सांगितले की, युक्रेनच्या ओडेसा बंदरावर जोरदार हल्ला झाला असून या भागात सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. सध्या या भागात पुनर्संचयित करण्याचे काम सुरु आहे. तसेच त्यांनी रशियाला दहशतवादी संबोधले आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही रशियान दहशतवाद्यांविरोधात अनेक पातळ्यांवर युद्ध लढत आहोत.
याच वेळी झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी हातभार लावणाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, युक्रेनला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभारा मानतो. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी युद्ध संपण्याची त्यांना एक संधी मिळाली पाहिजे असेही झेलेन्स्की यांनी म्हटले.
या सर्व घडमोडींदरम्यान रशियाने युक्रेनसमोर संघर्ष थांबवण्यासाठी एक अट ठेवली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनसमोर युद्धबंदीसाठी एक अटक ठेवली आहे. ही अट मान्य झाली तर संघर्षाच्या निराकरणासाठी तयार आहे. पुतिन यांनी म्हटले आहे की, युक्रेनला शांतता हवी असेल तर चर्चेच्या अटी सोडून रशियाच्या ताब्यातील प्रदेशांवरील दावे सोडावेत. यानंतरच रशिया युद्धबंदी करारावर सहमत होईल असे पुतिन यांनी म्हटले आहे.
Over the past week, Russia has launched approximately 1,300 attack drones, nearly 1,200 guided aerial bombs, and 9 missiles of various types against Ukraine. Odesa region and our south were hit particularly hard. Our services continue their work to restore normal life in the… pic.twitter.com/oKsQDOUjD2 — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) December 21, 2025
Ans: रशियाने युक्रेनवर एका आठवड्यात १,३०० ड्रोन, १,२०० ग्रेनेड बॉम्ब आणि ९ क्षेपणास्त्रे डागली आहेत.
Ans: रशियाने युक्रेनच्या ओडेसा बंदरावार आणि युक्रेनच्या दक्षिण भागावर हल्ला केला आहे.
Ans: रशियाने युक्रेनला शांतता हवी असेल तर चर्चेच्या अटी सोडून रशियाच्या ताब्यातील प्रदेशांवरील दावे सोडावेत असे रशियाने म्हटले आहे.