
russia proposes upgrade 3600 indian army t90 t72 tanks anti drone technology 2026
Russia India Tank Upgrade Proposal 2026 : जागतिक संरक्षणाच्या क्षेत्रात भारत आणि रशियाच्या जुन्या मैत्रीचा एक नवा आणि अत्यंत महत्त्वाचा अध्याय सुरू होणार आहे. १९९० च्या दशकात जेव्हा रशिया तीव्र आर्थिक संकटात होता आणि त्यांची आघाडीची रणगाडा कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर होती, तेव्हा भारताने अब्जावधी डॉलर्सचा करार करून रशियन टँक उद्योगाला संजीवनी दिली होती. आता तीच ऐतिहासिक मदत लक्षात ठेवून रशिया भारताचे हे ‘कर्ज’ फेडायला तयार झाला आहे. रशियाचे प्रगत वेपन डिझायनर आणि ‘उरल डिझाइन ब्युरो’चे मुख्य डिझायनर आंद्रेई तेर्लिकोव्ह यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यातील तब्बल ३,६०० हून अधिक रशियन बनावटीच्या रणगाड्यांना आमूलाग्र बदलून त्यांना आधुनिक युद्धासाठी सज्ज करण्याचा एक महाप्रस्ताव भारतासमोर ठेवला आहे.
सध्याच्या आधुनिक युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरू असलेल्या संघर्षात एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली आहे की, लाखो-करोडो रुपयांचे अवाढव्य रणगाडे आता छोट्या आणि स्वस्त ड्रोन हल्ल्यांमुळे सहज निकामी होत आहेत. युक्रेनियन सैन्याने रशियन रणगाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. याशिवाय, भारताचा शेजारी देश चीनने देखील अत्याधुनिक, पुढच्या पिढीचे लाइट टँक्स विकसित केले आहेत जे सध्याच्या टी-९० पेक्षा तांत्रिकदृष्ट्या सरस मानले जात आहेत. हीच चिंता लक्षात घेऊन भारताच्या ३,६०० रणगाड्यांना म्हणजेच २,४०० हून अधिक टी-७२ ‘अजेया’ आणि १,२०० हून अधिक टी-९० ‘भीष्म’ रणगाड्यांना तात्काळ अपग्रेड करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ebola Outbreak: विना उपचाराचा मृत्यू! इबोलाच्या ‘Bundibugyo’ स्ट्रेनचे संकट; 50% मृत्यूदर, भारताचीचीही मोठी तयारी
उरल डिझाइन ब्युरोचे महासंचालक आंद्रेई तेर्लिकोव्ह यांनी स्पुतनिक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत भारताला तीन प्रमुख आघाड्यांवर एकत्र काम करण्याची ऑफर दिली आहे. पहिल्या प्रस्तावानुसार, रशिया भारताच्या ताफ्यातील जुन्या टी-७२ आणि टी-९० रणगाड्यांना आधुनिक ‘फायर कंट्रोल सिस्टीम’ (Fire Control System) आणि कवच पुरवणार आहे, ज्यामुळे ते ड्रोन हल्ल्यांना हवेतच नष्ट करू शकतील. दुसऱ्या प्रस्तावात, रशिया आपल्या सर्वात घातक अशा ‘T-14 अरमाटा’ टँक प्लॅटफॉर्मचे तंत्रज्ञान भारतासोबत शेअर करण्यास तयार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर भारताच्या आगामी ‘फ्युचर रेडी कॉम्बॅट व्हेइकल’ (FRCV) म्हणजेच भविष्यातील महाबली रणगाड्यासाठी केला जाईल. तिसऱ्या प्रस्तावांतर्गत, रशिया आपल्या युक्रेन युद्धातील थेट अनुभवांच्या आधारे भारताच्या ‘भीष्म’ रणगाड्यांना ‘T-90M’ या जगातील सर्वोत्तम टँकच्या पातळीवर श्रेणीसुधारित करणार आहे.
Russia has officially confirmed discussions with India for more S-400 air defence systems. 🇮🇳 And that says a lot about how India sees the future battlefield. Ukraine, the Middle East and even recent regional conflicts have shown one thing very clearly the side that cannot stop… pic.twitter.com/vBzglnBQjt — Military Observer (@TheMilObserverr) May 26, 2026
credit – social media and Twitter
हा इतिहास जाणून घेणे रंजक आहे की, आज जो रशिया भारताला मदत करत आहे, त्याला एकेकाळी भारतानेच विनाशाच्या उंबरठ्यावरून मागे आणले होते. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशिया भीषण आर्थिक संकटाचा सामना करत होता. त्यांची प्रसिद्ध रणगाडा निर्मिती कंपनी ‘उरालवागोनझावोड’ पूर्णपणे दिवाळखोर झाली होती. त्यांच्याकडे टी-९० रणगाड्याची अप्रतिम डिझाईन असूनही रशियन लष्कराकडे ते खरेदी करायला पैसे नव्हते. अशा वेळी भारताने १५ फेब्रुवारी २००१ रोजी रशियासोबत अंदाजे ६०० ते ७५० दशलक्ष डॉलर्सचा करार करून ३१० टी-९० रणगाड्यांची ऑर्डर दिली. भारताच्या या ऐतिहासिक व्यवहारामुळे रशियाचा संपूर्ण रणगाडा उद्योग कोलमडण्यापासून वाचला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Hunger Day : प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या जगात आजही कोट्यवधी लोक भुकेने व्याकुळ; ‘या’ दिनानिमित्त ‘शून्य भूक’ ध्येयाची गरज
भारताने केवळ थेट रणगाडे खरेदी केले नाहीत, तर चेन्नईतील आवडी येथील ‘हेवी व्हेईकल्स फॅक्टरी’मध्ये (HVF) १,००० हून अधिक टी-९० रणगाड्यांच्या स्थानिक उत्पादनासाठी रशियासोबत तंत्रज्ञान हस्तांतरण (ToT) करारावर स्वाक्षरी केली होती. नुकताच भारतीय कारखान्याने आपला १,००० वा स्वदेशी टी-९० टँक लष्कराला सुपूर्द केला आहे. भारताकडे आधीच टी-७२ चे विशाल जाळे असल्यामुळे आणि त्याचा ६०% भाग टी-९० शी मिळताजुळता असल्याने भारतीय अभियंत्यांना या आधुनिक तंत्रज्ञानावर काम करणे अतिशय सोपे जाणार आहे. रशियाच्या या प्रस्तावामुळे भारतीय लष्कराची मारक क्षमता तर वाढेलच, सोबतच आत्मनिर्भर भारतालाही मोठी ताकद मिळेल.
Ans: रशिया भारतीय लष्कराच्या ताफ्यातील ३,६०० हून अधिक रणगाड्यांना, ज्यामध्ये २,४०० टी-७२ 'अजेया' आणि १,२०० टी-९० 'भीष्म' टँक्सचा समावेश आहे, त्यांना आधुनिक बनवणार आहे.
Ans: युक्रेन युद्धात ड्रोन हल्ल्यांमुळे रणगाडे असुरक्षित ठरले आहेत. त्यामुळे रशिया आपल्या युद्धानुभवाचा वापर करून भारतीय रणगाड्यांना 'अँटी-ड्रोन' कवच देणार आहे.
Ans: FRCV (Future Ready Combat Vehicle) हा भारताचा भविष्यातील मुख्य रणगाडा प्रकल्प आहे, ज्यासाठी रशिया आपले प्रगत 'T-14 अरमाटा' तंत्रज्ञान देण्यास तयार आहे.