
Russia Snowfall
सध्या परिस्थिती अधिक गंभीर असून आपत्कलानी परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये उंच बर्फाचे डोंगर तयार झाले आहेत. रस्ते, घरे आणि वाहने देखील बर्फाखाली गाडले गेले आहे. लोकांना घरातून बाहेर पडण्यासाठी खिडकीतून उडी मारावी लागत आहे. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.यामध्ये लोक बर्फात उतरुन रस्ता साफ करताना दिसत आहे. कोणी खिडकीतून बाहेर येताना दिसत आहे. एक व्यक्ती 5 फूट बर्फाखाली अडकलेली आपली कार काढण्याचा प्रयत्न करत आहे.
🚨⚡️ Yesterday in Russia, in the Kamchatka region, people were digging out their cars from massive snow piles ❄️ pic.twitter.com/rZnGkMPdPw — RussiaNews 🇷🇺 (@mog_russEN) January 17, 2026
रशियात 13 जानेवारी 2026 रोजी तीव्र चक्रीवादळ आले होते. या वादळामुळे एका दिवसात सामान्य मासिक पर्जन्यमानाच्या 30 ते 60 टक्के बर्फ पडला आहे. यामुळे शाळा, सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच विमान उड्डाणांवरही याचा परिणाम होत आहे. सरकार बर्फाखाली अडलेल्या नागरिकांना बारे काढण्याचा प्रयत्न करत आहे. या बर्फाखाली अडकून दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
याशिवाय स्थानिक प्रशासनाने देखील बर्फ हटवण्याचे कार्य सुरु केले आहे. यासाठी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. तज्ज्ञांनी आणखी काही दिवस तीव्र बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे कामचटका प्रदेशात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, कामचटका हा भाग पर्वतीय असून येथे थंड वारे वाहत असतात. तसेच हा भाग प्रशांत महासागराच्या आणि ओखोत्सक सागराच्यामध्ये स्थित आहे. यामुळे येथी आद्रतेमुळे हिमवृष्टी घडते. यंदा हवामान बदलामुळे महासागर अधिक उष्ण झाले असून त्याची आर्द्रता वाढत आहे. यामुळेच बर्फवृष्टी अधिक होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.