आधी बाचाबाची, मग थेट हाणामारी! दिल्ली मेट्रोत महिलांचा तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्..., VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. याच वेळी या गर्दीत दोन महिला एकमेकींच्या केस ओढताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातील या महिलांमध्ये सीटवरुन शाब्दिक वाद सुरु झाला होता. परंतु या शाब्दिक वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत बदलले. तुम्ही पाहू शकता की, महिलांना सीट न मिळाल्यामुळे दोघीही उभ्या राहून प्रवास करत आहेत. याच वेळी एकजण उतरणार असताना या महिलांमध्ये सीटवर कोण बसणार यावरुन वाद सुरु होते. दोन्ही महिला एकमेकींना शिवीगाळ करतात. तसेच एक महिला दुसरीच्या डोक्यात मारायला सुरुवात करते. यामुळे ती महिला देखील शांत न बसता तिला मारणाऱ्या महिलेचे केस ओढते. दोघींमध्ये प्रचंड गर्दीच राडा सुरु असतो.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मं इन्स्टाग्रावर @delhinewsxpress या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने मी तर रोज पॉपकॉर्न घेऊन जातो असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने टीव्हीपेक्षा तर मेट्रोत मनोरंजन जास्त असते असे म्हटले आहे. यापूर्वी देखील मेट्रोतील भांडणांचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे दिल्ली करांसाठी आता मेट्रोत भांडणे पाहयाला मिळणे ही सामान्य बाब बनली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






