Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Power Balance : मध्य पूर्वेत नवा खेळ; इराण नव्हे तर रशियाने ‘या’ दोन मुस्लिम देशांना युद्धसज्जतेसाठी बनवले महत्त्वाचे प्यादे

Russia Egypt Oman : रशिया मध्य पूर्वेत आपला प्रभाव वेगाने वाढवत आहे. खरं तर, इजिप्त आणि ओमानच्या अलिकडच्या भेटींद्वारे, मॉस्कोने स्पष्ट केले की त्यांची नवीन रणनीती केवळ इराणपुरती मर्यादित नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 21, 2025 | 03:14 PM
Russia strengthens ties with Egypt Oman and other Muslim nations

Russia strengthens ties with Egypt Oman and other Muslim nations

Follow Us
Close
Follow Us:
  • रशिया आता मध्य पूर्वेत फक्त इराणवर अवलंबून नसून नवीन मुस्लिम मित्रदेश शोधत आहे.
  • इजिप्त आणि ओमानच्या उच्चस्तरीय भेटींनी रशियाची नवीन रणनीती स्पष्ट झाली.
  • लष्करी सहकार्य, अणुऊर्जा प्रकल्प आणि नौदल करार हे या नवीन भागीदारीचे मुख्य मुद्दे आहेत.

Russia Egypt Oman Ties : मध्य पूर्वेत सत्ता संतुलन वेगाने बदलत आहे आणि या संपूर्ण समीकरणात रशिया (Russia) पुन्हा एकदा मजबूत खेळाडू म्हणून उभरत आहे. विशेष म्हणजे, ही मोहीम आता केवळ इराणपर्यंत मर्यादित नसून मॉस्कोने इजिप्त (Egypt ) आणि ओमान (Oman) यांना आपल्या नवीन रणनीतीतील महत्त्वाचे भागीदार म्हणून पुढे केले आहे. अलीकडेच रशियाचे सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोयगु यांनी इजिप्त आणि ओमानला दिलेली भेट हा या बदलत्या भू-राजकीय पटाचा सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे.

अमेरिकेबाबत वाढता अविश्वास आणि रशियाची संधी

अमेरिकेच्या मध्य पूर्व धोरणांबाबत वाढत्या नाराजीमुळे या प्रदेशात नवीन पर्यायांसाठी जागा निर्माण होत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फायदा रशिया घेताना दिसत आहे. इराण हा रशियाचा जुना मित्रदेश असला तरी, मॉस्को या प्रदेशात स्वतःला संतुलित शक्ती म्हणून सादर करू इच्छिते आणि म्हणूनच इजिप्त आणि ओमानसारखे तुलनेने शांत, परंतु प्रादेशिक प्रभाव असलेले देश आता केंद्रबिंदू बनत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Regional Conflict : दक्षिण आशियात युद्धाची चाहूल, काबूल होणार रणांगण; पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिम देशांना अंतिम संदेश

 इजिप्त: लष्करी भागीदारीपासून अणुऊर्जा प्रकल्पापर्यंत प्रगती

कैरोमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत रशिया आणि इजिप्तमधील लष्करी सहकार्याला नवीन गती मिळाली. इजिप्तचे संरक्षण मंत्री अब्देल माजिद सकर आणि शोयगु यांच्यात झालेल्या चर्चेत नियमित संयुक्त सैन्य सराव, हवाई सुरक्षा प्रशिक्षण आणि दहशतवादविरोधी कारवाया यावर सहमती झाली. रशियाने इजिप्शियन सैन्य अधिकाऱ्यांना रशियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण देण्याचा प्रस्तावही मांडला, ज्याला कैरोने सकारात्मक प्रतिसाद दिला. राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी झालेल्या बैठकीत एल-दाबा अणुऊर्जा प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. हा प्रकल्प वेळापत्रकानुसार सुरळीत सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तसेच सुएझ कालव्याजवळील रशियन औद्योगिक क्षेत्रावरही महत्त्वपूर्ण चर्चा झाली जे भविष्यात रशिया-इजिप्त व्यापाराचे सर्वात मोठे केंद्र ठरू शकते.

ओमान: शांत कूटनीतिच्या केंद्रात रशियाचा प्रवेश

ओमान हा मध्य पूर्वेतील तटस्थ आणि मध्यस्थी करणारा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे रशियासाठी हा देश निर्णायक रणनीतिक ठरतो. सुलतान हैथम बिन तारिक यांच्यासोबत झालेल्या भेटीमध्ये युक्रेन युद्धापासून प्रादेशिक संकटांपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली.

रशियाने ओमानकडे खालील प्रस्ताव मांडले:

  • सुरक्षा परिषदेतील नियमित संवाद
  • नौदल जहाजांचे सलालाह आणि मस्कट बंदरांवर डॉकिंग
  • सागरी मार्ग संरक्षण, चाचेगिरीविरोधी कारवाया आणि दहशतवादविरोधी सहकार्य
  • संयुक्त प्रशिक्षण आणि तांत्रिक सहकार्य

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gaza Tunnel : शब्दांत न सांगता येणारी युद्धरचना! इस्रायलला गाझामध्ये सापडला रहस्यमय बोगदा, VIDEO VIRAL

या चर्चेमुळे ओमान-रशिया संबंध भविष्यात आणखी मजबूत होतील, अशी तज्ज्ञांची धारणा आहे. रशियाची ही नवी रणनीती स्पष्टपणे सूचित करते की मॉस्को आता मध्य पूर्वेत पुन्हा एकदा मोठा आणि प्रभावी शक्तिकेंद्र होण्यासाठी तयारी करत आहे. इजिप्त आणि ओमानच्या भेटी हा सुरुवात आहे—आणि पुढील काही महिन्यांत हा भू-राजकीय पट आणखी नाट्यमयरीत्या बदलू शकतो.

Web Title: Russia strengthens ties with egypt oman and other muslim nations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • Egypt
  • International Political news
  • iran
  • Russia

संबंधित बातम्या

Regional Conflict : दक्षिण आशियात युद्धाची चाहूल, काबूल होणार रणांगण; पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिम देशांना अंतिम संदेश
1

Regional Conflict : दक्षिण आशियात युद्धाची चाहूल, काबूल होणार रणांगण; पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिम देशांना अंतिम संदेश

John Kiriakou : भारत पाकिस्तानला हरवेल! Ex-CIA अधिकाऱ्याचा धडाकेबाज दावा; इम्रान पक्षाला दिले धक्कादायक उत्तर
2

John Kiriakou : भारत पाकिस्तानला हरवेल! Ex-CIA अधिकाऱ्याचा धडाकेबाज दावा; इम्रान पक्षाला दिले धक्कादायक उत्तर

S400 India : 50% स्वदेशीकरणासह भारताची मोठी झेप; रशियाची मोठी ऑफर अन् हवाई संरक्षणात महासत्ता बनण्याचा मोदींचा मास्टरस्ट्रोक
3

S400 India : 50% स्वदेशीकरणासह भारताची मोठी झेप; रशियाची मोठी ऑफर अन् हवाई संरक्षणात महासत्ता बनण्याचा मोदींचा मास्टरस्ट्रोक

Climate Summit 2025 : COP30 ब्लू झोनमध्ये भीषण आग;UN प्रमुख आणि भारतीय नेते थोडक्यात बचावले
4

Climate Summit 2025 : COP30 ब्लू झोनमध्ये भीषण आग;UN प्रमुख आणि भारतीय नेते थोडक्यात बचावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.