ओमानने भारताला दिली कमालीची टक्कर, भारताने जिंकला सामना (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या आशिया कप २०२५ च्या शेवटच्या गट टप्प्यातील सामन्यात भारताने ओमानसमोर १८९ धावांच्या लक्ष्या ठेवले. मात्र ओमानच्या संघाने भारतीय संघाला आज चांगलेच रडवले. हा सामना जिंकण्यासाठी भारताला खूपच लढावे लागले. ही मॅच आपल्याच हातात असा विश्वास असणाऱ्या भारतीयांनाही या टीमने विचार करण्यास भाग पाडले.
कुलदीप यादवने भारताला पहिले यश मिळवून दिले. पहिल्या पॉवरप्लेमध्ये ओमानने ४४ धावा केल्या. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामान्यात अखेर भारताने यश मिळवले. सूर्यकुमार यादव या सामन्यात खेळला नाही तर ही धुरा आज संजू सॅमसनने घेतली होती.
भारताचा डाव
संजू सॅमसनच्या अर्धशतकामुळे भारताने अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या आशिया कप २०२५ च्या शेवटच्या गट टप्प्यातील सामन्यात २० षटकांत ८ बाद १८८ धावा केल्या, ज्यामुळे ओमानला विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय फलंदाजीचा क्रम लक्षणीयरीत्या बदललेला दिसत होता. कर्णधार सूर्या स्वतः फलंदाजीसाठी उतरला नाही. भारताकडून संजू सॅमसनने ५६, अभिषेक ३८, तिलक २९ आणि अक्षरने २६ धावा केल्या. ओमानकडून जितेन, शाह फैसल आणि आमिर कलीम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
ओमानची खेळी
भारताविरुद्धच्या सामन्यात ओमानने स्थिर सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, ओमानने पहिल्या ५ षटकांत कोणताही विकेट न गमावता ३३ धावा केल्या. कुलदीप यादवने टीम इंडियाला ओमानविरुद्ध पहिले यश मिळवून दिले. कुलदीपने ओमानचा कर्णधार जतिंदर सिंगला बाद केले. जतिंदरने ३३ चेंडूत ३२ धावा केल्या. अशाप्रकारे ओमानने ५६ धावांवर आपला पहिला बळी गमावला.
मिर्झा आणि आमिर कालिम या जोडीने कमालीची खेळी करत ओमानचा विजय जवळ आणून दिला होता. फोर्स आणि सिक्स मारत या जोडीने कमाल करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. हम्माद मिर्झानेदेखील आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ५१ धावा करून हार्दिकच्या चेंडूवर आपली विकेट गमावली. या जोडीचा यानंतरही खेळ व्यर्थ गेला.
अक्षर पटेलला दुखापत
भारताला या मॅचमध्ये जिंकण्यात बऱ्याच अडचणी आल्या. कॅच घेण्यासाठी गेलेल्या अक्षर पटेलला दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तो ऑफवर बॅक-ऑफ-लेन्थ चेंडू होता. त्याने तो मिड-ऑफच्या दिशेने खेळला. अक्षरने कॅच सोडला. तीन प्रयत्नांनंतरही चेंडू पकडण्यात अक्षर अपयशी ठरला. तो फिजिओसोबत मैदानाबाहेर गेला. त्यामुळे पुढील सामन्यात अक्षर खेळू शकेल की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.
IND vs OMA: संजू सॅमसनची धमाकेदार खेळी! ओमानला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान
दोन्ही संघ या अंतिम इलेव्हनसह
भारत अंतिम इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
ओमान अंतिम इलेव्हन: आमिर कलीम, जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (यष्टिरक्षक), शाह फैसल, झिकारिया इस्लाम, आर्यन बिश्त, मोहम्मद नदीम, शकील अहमद, समय श्रीवास्तव, जितेन रामानंदी