मास्को: रशिया-युक्रेन तणाव आणखीनच वाढला आहे. दरम्यान युक्रेनने रशियावर हल्ला केल्यानंतर आता रशियाने हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने ड्रोन, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ग्लाइड बॉम्बचा वापर करून हे हल्ले कले आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रिशायाने विशेषत: युक्रेनच्या दक्षिण-पश्चिम भागातील महत्त्वाची शहरे लक्ष्य केली आहेत.
युक्रेनच्या दोन महत्त्वाच्या शहरांवर हल्ला
मीडिया रिपोर्टनुसार, रशियाने युक्रेनच्या मायकोलायव्ह आणि झापोरिझिया या शहरांवर हल्ला केला आहे. मायकोलायव्ह शहरावर ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. याममध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांत 45 वर्षीय महिला जखमी झाल्याची नोंद आहे. या शहरावरील हल्ल्यामुळे युक्रेनच्या दक्षिणेकडील भागात असुरक्षितता वाढली आहे.
युक्रेनच्या हल्ल्यांचे चोख प्रत्युत्तर- रशिया
झापोरिझिया शहरावरही रशियाने तीन ग्लाइड बॉम्ब डागले आहेत. यामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला रविवारी मॉस्कोवर युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला असल्याचे रशियाने म्हटले आहे. युक्रेनने मॉस्कोवर 34 ड्रोन हल्ले केले होते. यामुळे रशियाने जोरदार प्रत्युत्तर दिले. या घटना रशिया-युक्रेन संघर्षात वाढत्या तणावाची आणि कठोर हल्ल्यांची नोंद घडवत आहेत.
हे देखील वाचा- युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला; मॉस्कोच्या शस्त्रास्त्र कारखान्यावर ड्रोनचा कहर
युक्रेनचा दावा
युक्रेनने दावा केला आहे की त्यांनी रशियन लष्करी हेलिकॉप्टर एमआय-24 नष्ट केले आहे. युक्रेनच्या गुप्तचर संस्थेच्या मते, मॉस्को जवळील क्लिन-5 एअरफील्डवर हा हल्ला झाल. यामध्ये रशियाचे हेलिकॉप्टर नष्ट झाले. तसेच, रशियाने युक्रेनचे 17 ड्रोन पाडले असल्याचे म्हटले आहे. जे कुर्स्क, बेल्गोरोड आणि वेरोनीज भागात कार्यरत होते.
युक्रेनचे रशियावरी हल्ले
तसेच युक्रेनने शुक्रवारी रात्री उशिरा रशियाच्या तुला शहरातील रासायनिक प्लांटवर हल्ला केला होता. युक्रेनच्या स्पेशल ऑपरेशन्स फोर्सने 13 ड्रोन वापरून हा हल्ला केला. हल्ल्यामुळे केमिकल प्लांटमध्ये स्फोट होऊन धुराचे ढग पसरले. हा प्लांट रशियन सैन्यासाठी दारूगोळा तयार करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे हल्ल्याचे परिणाम अधिक गंभीर ठरले.
यानंतरच या सर्व हल्ल्यांचे प्रत्युत्तर रशियाने दिले आहे. सप्टेंबर महिन्यात युक्रेनने रशियावर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले होते या ड्रोन हल्ल्यात मॉस्कोसारख्या महत्त्वाच्या शहरांवर लक्ष्य साधले गेले. रशिया-युक्रेन युद्धात अशा हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिक गडद होत असून युद्धाची तीव्रता वाढली आहे.