इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Iran America Relations : तेहरान : अमेरिका (America) आणि इराणमध्ये (Iran) पुन्हा संबंध बिघडण्याची शक्यता आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी पुन्हा एकदा अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी दिली आहे. खामेनींनी इराणवर पुन्हा हल्ला केल्यास याचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायलसोबत (Israel) पुन्हा एकदा तणाव बिघडण्याची शक्यता आहे.
इराणची अमेरिकेला चेतावणी
इराणच्या वरिष्ठ कार्यालयाने या संबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, ‘अमेरिका इराणवर हल्ला करण्यास सक्षम नाही. यामागचे कारण म्हणजे इराणची वाढती लष्करी ताकद आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती. इराणने होर्मूज सामुद्रधानी बंद करण्याची धमकीही इस्रायल आणि अमेरिकेला दिला आहे. यामुळे अमेरिकेला इराणपुढे झुकावेचट लागेल नाहीतर, पुन्हा युद्ध सुरु होईल अशी चर्चा सुरु झाल्या आहेत.
इराणने देखील शत्रू आता त्यांच्यावर हल्ला करु शकत नाही, असे म्हटले आहे. इराणने तेल मार्ग बंद केल्यास अमेरिकेला १५० डॉलर्स प्रति बॅरल तेलाचे भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. हे भरण्यास अमेरिका सक्षम नसल्याचे इराणने म्हटले आहे.
पाकिस्तानात आणखी एक अपघात; प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने १ जण ठार २० हून अधिक जखमी
दोन महिन्यांपूर्वी इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र संघर्ष सुरु होता. १३ जून रोजी इस्रायलने ऑपरेशन राझिंग लायन सुरु करत इराणवर हल्ला केला होता. इराणच्या वरिष्ठ लष्करी आणि अणु अधिकाऱ्यांना इस्रायलने ठार केले होते. तसेच अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फाहन या अणु तळांवर हल्ला केला होता.
यावेळी इराणने संतप्त होत ‘स्ट्रेट ऑफ होर्मूज’ बंद करण्याची धमकी दिली होती. हा तेल वाहतूकीचा जल मार्ग आहे. येथून जगभरातून २०% तेल आयात केले जाते. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक पातळीवर तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्याता आहे. यामुळे पुन्हा युद्ध झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होईल, अशा भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
याच वेळी इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी देखील खळबळजनक विधान केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी, “अमेरिका इराणला हरवू शकता नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे आता त्यांनी चर्चा सुरु केली आहे. यासाठी इराण सकारात्मक प्रतिसाद देईल. पण ही चर्चा पुढील युद्धाची तयारी असेल तर , याचे अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असे म्हटले आहे.
अणु कार्यक्रम सुरुच ठेवणार
इराणने आपला अणु कार्यक्रम सुरुच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच याचा हेतू केवळ त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी असल्याचेही इराणने म्हटले आहे. पण अमेरिका आणि इस्रायलने, तसेच युरोपिय देश फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीने याला विरोध केला आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यंत अणु करारावरील चर्चा सुर करण्यास चेतावणी दिली आहे. चर्चा न झाल्यास इराणवर कठोर निर्बंध लादण्याचाही इशारा देण्यात आहे.
इराणच्या अणु प्रकल्पाला रोखण्यासाठी इस्रायलने इराणविरोधी संघर्ष पुकारला होता. इस्रायलच्या मते इराणचा अणु प्रकल्प त्यांचे अस्तित्व धोक्यात आणू शकतो.
किती दिवस सुरु होता इराण-इस्रायलमध्ये संघर्ष?
इराण आणि इस्रायलमध्ये १२ दिवसांपासून संंघर्ष सुरु होता. १३ जून २०२५ रोजी हा संघर्ष सुरु झाला तो जवळपास २२ जून २०२५ पर्यंत सुरु होता.
नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत