रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली 'ही' अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine War : दोन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) थांबवण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून हे युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. परंतु या चर्चा अपयशी ठरल्या आहे. याच वेळी शुक्रवारी अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्यात एक बैठक पार पडली.
ही बैठक युक्रेनमधील युद्धावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यावर होती. पण या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत होते. पण आता ट्रम्प यांनी हे युद्ध संपणार असल्याचे संकेत दिले आहे.
ट्रम्प यांनी या बैठकीनंतर रशिया युक्रेन युद्ध थांबू शकते असा मोठा दावा केला आहे. पण यासाठी रशियाचे पुतिन यांच्या काही अटी युक्रेनला मान्य कराव्या लागतील असे त्यांनी म्हटले आहे.
यामुळे युद्ध संपवणे आता पूर्णपणे युक्रेनच्या हाती असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्लादिमिर पुतिन यांनी देखील याचे संकेत दिले आहे. त्यांनी स्वत: हा युरोपीय देशांशी फोनवरुन चर्चा केली आहे. पुतिन यांनी आपल्या अटी युरोपीय देश आणि युक्रेनला सांगितले आहेत.
दरम्यान यापूर्वी देखील रशियाने या अटी युरोपीय देशांसमोर मांडल्या होत्या. पण युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी याला ठाम नकार दिला होता. तसेच युक्रेनने कोणत्याही प्रदेशाची आदलाबदलीसही नकार दिला होता. त्यांना युक्रेनचे विभाजन होऊ देणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते.
ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत