Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine War : रशियाविरुद्ध युक्रेनला मिळणार ‘कवचकुंडल’; फ्रान्स पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रतिबंधक प्रणाली

Russia-Ukraine War: रशियन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी फ्रान्स युक्रेनला नवीन क्षेपणास्त्रे पुरवणार असल्याची घोषणा केली आहे. वाढत्या रशियन हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय का महत्त्वाचा आहे, हे जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 23, 2026 | 04:07 PM
Emmanuel Macron Ukraine air defence support

Emmanuel Macron Ukraine air defence support

Follow Us
Follow Us:
  • हवाई संरक्षण यंत्रणांचा पुरवठा
  • स्थानिक क्षेपणास्त्र उत्पादनासाठी परवाने
  • युरोपीय मित्रांची ‘इच्छुक आघाडी’

रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine war) दरम्यान गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस अधिक भीषण व चिंतेचे रूप धारण करत आहे. रशियन सैन्याकडून युक्रेनच्या विविध शहरांवर सातत्याने हवाई आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या आकाशाचे रक्षण करण्यासाठी युक्रेनने जागतिक स्तरावर मदतीची हाक दिली होती. युक्रेनच्या या गरजेला सकारात्मक प्रतिसाद देत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेनला अत्यंत आधुनिक क्षेपणास्त्र प्रतिबंधक प्रणाली (Air Defence Systems) आणि क्षेपणास्त्रे पुरवण्याची मोठी घोषणा केली आहे. फ्रान्सच्या या निर्णयामुळे रशियाच्या भीषण हवाई हल्ल्यांना तोंड देणाऱ्या युक्रेनला मोठा लष्करी आणि मानसिक आधार मिळाला आहे.

फ्रान्स आणि युक्रेन दरम्यान पार पडलेल्या उच्चस्तरीय चर्चेदरम्यान इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या ऐतिहासिक करारावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले. या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट करताना मॅक्रॉन म्हणाले की, युक्रेनमधील निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवणे आणि त्यांच्या आकाशाचे रक्षण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. रशियाने युक्रेनमधील नागरी वस्त्यांवर आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर केलेले हल्ले हे अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे रशियन क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करू शकतील अशा सर्व अत्याधुनिक उपकरणांची व क्षेपणास्त्रांची मदत युक्रेनला पुरवली जाईल, अशी ग्वाही फ्रान्सने दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral News: बालीमध्ये हिंदू सणाचा अवमान करणाऱ्या पर्यटकाला 1 वर्षाचा तुरुंगवास; सोशल मीडियावर व्हायरल ‘तो’ वादग्रस्त VIDEO

रशियन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वाढता धोका आणि युक्रेनची अडचण

रशियाने गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनवरील हवाई हल्ल्यांची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढवली आहे. विशेषतः युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक प्रमुख शहरांवर रशियाकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वेगाने वापर केला जात आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अत्यंत वेगाने आपल्या लक्ष्याकडे झेपावतात, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना धोक्याचा इशारा मिळाल्यानंतरही सुरक्षित बंकर किंवा आश्रयस्थानांमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. नुकत्याच झालेल्या शुक्रवारी आणि शनिवारच्या रशियन हल्ल्यांमध्ये १३ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अहवालानुसार, चालू वर्षातील नागरिकांच्या मृत्यूचा हा आकडा युद्धाच्या सुरुवातीच्या महिन्यांनंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.

सध्या युक्रेनकडे रशियन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना हवेतच रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक क्षेपणास्त्र रोधकांची अत्यंत भीषण कमतरता भासत आहे. अमेरिकेची ‘पॅट्रियट’ (Patriot) प्रणाली ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पाडण्यात अत्यंत प्रभावी मानली जाते, परंतु या प्रणालीच्या क्षेपणास्त्रांचा साठा संपत आल्याने युक्रेनचे आकाश असुरक्षित बनले होते. युक्रेन स्वतःच्या जुन्या शस्त्रास्त्रांच्या जोरावर रशियाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला रोखण्यात असमर्थ ठरत होते. याच कारणामुळे फ्रान्सने दिलेल्या नवीन हवाई संरक्षण प्रणालीच्या आश्वासनाला युक्रेनसाठी अत्यंत मोलाचे संजीवनी मानले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Flight 2398: हवेत लॅपटॉपचा भडका, केबिनमध्ये काळा धूर अन् 5 प्रवासी भाजले; अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात थरारक घटना

‘इच्छुक आघाडी’ आणि जागतिक महासत्तांची भूमिका

रशियाच्या वाढत्या आक्रमकतेला रोखण्यासाठी आणि युक्रेनला समर्थपणे उभे करण्यासाठी युरोपीय देशांची ‘इच्छुक आघाडी’ (Coalition of the Willing) सक्रिय झाली आहे. फ्रान्स आणि ब्रिटनच्या नेतृत्वाखालील या आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत रशियावर राजकीय आणि आर्थिक दबाव आणून युद्धविरामासाठी (Ceasefire) तयार करण्याची रणनीती आखली जाणार आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि पोलंड यांसारखे युरोपीय देश सातत्याने युक्रेनला आधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून रशियाला थेट आव्हान देत आहेत.

दुसऱ्या बाजूला, जागतिक राजकारणात निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीमुळे अमेरिकेचे प्राधान्य थोडे बदललेले दिसत आहे. अमेरिकेचे लक्ष सध्या युक्रेन-रशिया युद्धावरून हलून इराणसोबतच्या वाढत्या तणावावर केंद्रित झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः इराणसोबतच्या शांतता चर्चेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. रशिया-युक्रेन युद्ध अपेक्षेप्रमाणे लवकर संपू शकले नाही, याबद्दल त्यांनी जाहीर खेद व्यक्त केला आहे. अशा वेळी अमेरिका इतर आंतरराष्ट्रीय मुद्यांमध्ये व्यस्त असताना, फ्रान्स आणि ब्रिटनने युरोपच्या सुरक्षिततेसाठी युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Web Title: Russia ukraine war france emmanuel macron to supply missile defense system marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Emanuel Macron
  • Russia and Ukraine war
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.