Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine War : कीव्हवरील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू; रशिया-युक्रेन युद्धाची भारताला पुन्हा झळ

Russia-Ukraine War : रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह आणि आसपासच्या भागांवर सलग सहाव्या दिवशी मोठा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे. रेल्वे सुविधा, निवासी इमारती आणि नागरी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 01, 2026 | 05:01 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा
  • भारतीय नागरिकाच्या मृत्यूने चिंता वाढली
  • ओडेसालाही लक्ष ; युद्ध आणखी तीव्र होण्याची चिन्हे
Russia-Ukraine War : रशिया युक्रेन युद्धातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे . रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह आणि आसपासच्या भागांवर सलग सहाव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हल्ले केले आहे . या हल्ल्यात किमान १२ जणांचा मृत्यू झाला आहे .

या मृतांमध्ये एका भारतीय नागरिकाचाही समावेश असल्याची माहीती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली . हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून निवासी इमारती आणि नागरी पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे .

ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा

युक्रेनच्या राजधानीवर झालेल्या हल्ल्यात मोठ्या संख्येने ड्रोनसोबत बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला . युक्रेनच्या हवाई दलानुसार , रशियाकडून २१८ ड्रोन आणि विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्यात आली . यातील काही ड्रोन जेट इंजिनवर चालणारे असल्याने त्यांना रोखणे तुलनेने अधिक कठीण असल्याचे सांगण्यात आले . युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने अनेक हवाई लक्षे पाडल्याचा दावा केला आहे .

मात्र काही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन लक्षापर्यंत पोहोचल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . कीव्हमध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधांनाही हल्ल्याचा फटका बसला आहे . एका रेल्वे डेपोवरील हल्ल्यात सहा रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे . राजधानीच्या विविध भागांमध्ये निवासी आणि इतर नागरी इमारतींचे नुकसान झाले . कीव्ह परिसरातील बोरिस्लीपसह अन्य भागांमध्येही जीवितहानी आणि मोठे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले .

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन

भारतीय नागरिकाच्या मृत्यूने चिंता वाढली

या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने भारतासाठीही ही घटना महत्वाची ठरली आहे . युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मृतांचा आकडा सांगताना भारतीय नागरिकाचाही समावेश असल्याचे स्पष्ट केले . या घटनेमुळे युद्धग्रस्त युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .

Greece-Israel Deal : ग्रीसची आकाशाला ‘लोखंडी ढाल’; इस्रायलसोबत ३.५ अब्ज डॉलरचा करार

ओडेसालाही लक्ष ; युद्ध आणखी तीव्र होण्याची चिन्हे

कीव्हसोबतच युक्रेनच्या ओडिशा भागालाही रशियन हल्ल्याचा फटका बसला . बंदर आणि निर्यात सुविधांना नुकसान झाल्याने युक्रेनच्या व्यापार आणि माल वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे . रोमानियाच्या सीमेजवळील एका महत्वाच्या सीमा मार्गावरही हल्ला झाल्याचे युक्रेनने म्हंटले आहे .

सलग सहा दिवस सुरु असलेल्या हवाई हल्ल्यामुळे युक्रेनवरील दबाव वाढला आहे .विशेष म्हणजे युक्रेनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असतानाच हा मोठा हल्ला झाला . हवाई संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या क्षेपणास्त्रांची कमतरता आणि रशियाकडून बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर ही युक्रेनसमोरील प्रमुख आव्हाने ठरत आहेत . त्यामुळे युद्ध संपवण्यासाठी सुरु असलेल्या राजनैतिक प्रयत्नांवरही या नव्या हल्ल्यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे .

Web Title: Russia ukraine war indian national killed in attack on kyiv india feels the impact of the russia ukraine war once again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Drone
  • missile air strike
  • Russia
  • Russia Ukraine War

संबंधित बातम्या

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू
1

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

महाराष्ट्राच्या वाघिणीने रशियाचं मैदान मारलं! अन्वी हिंगेची ‘या’ खेळात ‘सुवर्ण’भरारी, पदकांची संख्या थेट…
2

महाराष्ट्राच्या वाघिणीने रशियाचं मैदान मारलं! अन्वी हिंगेची ‘या’ खेळात ‘सुवर्ण’भरारी, पदकांची संख्या थेट…

US Russia Oil Deal वरून वॉशिंग्टनमध्ये राजकीय वादळ; सिनेटर्समध्ये मोठी फूट, 18 ऑक्टोबरच्या निर्णयाकडे भारतासह जगाचे लक्ष
3

US Russia Oil Deal वरून वॉशिंग्टनमध्ये राजकीय वादळ; सिनेटर्समध्ये मोठी फूट, 18 ऑक्टोबरच्या निर्णयाकडे भारतासह जगाचे लक्ष

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?
4

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.