Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

Wrestling World Championship : भारताच्या विश्वजीत मोरेने अंडर-23 वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्याला फायनलमध्ये जॉर्जियाच्या कुस्तीपटूकडून पराभवाचा सामना करावा लागला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 15, 2026 | 03:08 PM
Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

Follow Us
Follow Us:
  • अंडर-23 मध्ये रौप्य पदकाची कमाई
  • भारताच्या 9 जणांचा व्हिसा नाकारला
  • विश्वजीतकडे होती गोल्ड जिंकण्याची संधी
 

भारतीय कुस्तीपटू विश्वजीत रामचंद्र मोरेने गुरुवारी अंडर-23 Wrestling World Championship च्या ग्रीको-रोमन कॅटेगरीत भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकले.

अंडर-23 वल्ड लेव्हलवर दोन वेळा ब्रॉन्ज मेडल जिंकलेल्या मोरेने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातील ग्रीको-रोमन फायनलमध्ये अखेरच्या क्षणी जॉर्जियाच्या कोबा कारुमिद्जेकडून 12-13 असा पराभूत झाला. मोरे अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये दोन मेडल जिंकणारा भारताचा एकमेव ग्रीको-रोमन कुस्तीपटू आहे.

विश्वजीतची ऐतिहासिक कामगिरी

तो मंगळवारी अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहचणारा भारताचा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू बनला होता. त्याने तीन अटीतटीच्या सामन्यात शानदार कामगिरी केली. तसेच मॅक्सिकोच्या इसाक मारिन माटाचा 10-8 असा पराभव करत आपल्या मोहिमेची सुरुवात केली.
क्वार्टर फायनलमध्ये त्याचा सामना इराणच्या अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियन आर्मिन शमसीपौरविरुद्ध झाला. शमसीपौरच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि विश्वजीतने एक ‘फोर-पॉइंटर थ्रो’ (चार गुण देणारा डाव) चा वापर करत त्याला 8-1 असे पराभूत केले.

Saudi Arabia मध्ये हल्ल्यानंतर फीफाने फीफा- ई -फायनल्स केले स्थगित, रियाधच्या इंटरनॅशनल विमानतळावर झाला होता मोठा हल्ला

गोल्ड जिंकण्याची होती संधी

रशियाचा मलिक गिगिएवविरुद्ध सेमिफायनलदेखील खूप रोमहर्षक राहिली, ज्यात दोन्ही कुस्तीपटूंना ‘चॅलेंज’ (रेफरीच्या निर्णयाला आव्हान देण्याची संधी)चा फायदा मिळाला. अखेर विश्वजीतने 6-4 च्या फरकाने सामना आपल्या बाजूने वळवला.

विश्वजीत फायनलमध्ये उत्साहात उतरला होता. तो अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या ग्रीको-रोमन स्पर्धेत गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला असता. दरम्यान, त्याला फायनलमध्ये जॉर्जियाच्या कुस्तीपटूकडून पराभवाचा सामना करावा लागला.

ICC World Cup 2027 चा दक्षिण आफ्रिकेत थरार! 12 दिवसांमध्ये 1.5 कोटींपेक्षा तिकिटांचे…; व्हाल थक्क

भारताच्या 9 जणांचा व्हिसा नाकारला

दरम्यान, त्याआधी भारताच्या मोहिमेदरम्यान एका प्रशासकीय अडचणीचा सामना करावा लागलेला. अंडर-23 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीप (लॉस वेगास)साठी भारताचे 9 कुस्तीपटू (ग्रीको-रोमन आणि महिला कुस्तीपटू) यांना व्हिसा मिळाला नव्हता, कारण ते 20 पेक्षा कमी वयाचे होते व आणि त्यांच्याकडे कोणतीच पूर्णवेळ नोकरी नव्हती.

डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष संजय सिंह याबाबत म्हणाले की, अमेरिकेच्या दूतावासाने हे सर्व बेरोजगार असल्याचे सांगत भारतीय कुस्तीपटूंचा व्हिसा नाकारला होता. इतिहासात हे पहिल्यांदाच असे घडले. येथपर्यंत की, यूडब्ल्यूडब्ल्यूच्या अध्यक्षांनीही याप्रकरणी त्यांना पत्र लिहिले होते. व्हिसा फेटाळणे पूर्णपणे अमेरिकन दूतावासाची चूक आहे. त्यामुळे भारताला गोल्ड मेडल गमवावा लागला.
ज्या दोन कुस्तीपटूंना व्हिसा नाही मिळाली, त्यातील कमीत कमी दोन असे होते, जे गोल्ड जिंकण्याचे प्रबळ दावेदार होते. अमेरिकन दूतावासाच्या चुकीमुळे भारताला पदकांचे मोठे नुकसान सोसावे लागले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विश्वजीत मोरेने जागतिक कुस्ती स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

    Ans: विश्वजीत रामचंद्र मोरेने अंडर-23 जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ग्रीको-रोमन प्रकारात रौप्यपदक जिंकले.

  • Que: विश्वजीत मोरे कोणत्या वजनी गटात खेळतो?

    Ans: तो पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात खेळतो. अंतिम सामन्यात त्याला जॉर्जियाच्या कोबा कारुमिद्जेकडून 12-13 असा पराभव स्वीकारावा लागला.

  • Que: विश्वजीत मोरेच्या कामगिरीचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे?

    Ans: अंडर-२३ जागतिक स्पर्धेच्या ग्रीको-रोमन प्रकारात अंतिम फेरी गाठणारा तो भारताचा पहिला कुस्तीपटू ठरला. यापूर्वी त्याने या स्पर्धेच्या स्तरावर दोन कांस्यपदकेही जिंकली होती.

Web Title: Vishwajit more silver medal under 23 wrestling world championship rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • America
  • Russia
  • Wrestler

संबंधित बातम्या

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
1

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
2

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
3

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Marco Rubio India Visit: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव 6 महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात; मुंबई अन् जामनगर दौऱ्यामागचे मोठे कारण काय?
4

Marco Rubio India Visit: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव 6 महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात; मुंबई अन् जामनगर दौऱ्यामागचे मोठे कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.