Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या वाघिणीने रशियाचं मैदान मारलं! अन्वी हिंगेची ‘या’ खेळात ‘सुवर्ण’भरारी, पदकांची संख्या थेट…

Chess Tournament: तुर्कमेनिस्तानच्या बागुल जुमायेवा हिला साडेसात गुणांसह रौप्य, तर रशियाच्या लेयला इसायेवा हिला सहा गुणांसह कांस्यपदक मिळाले. पाचव्या फेरीतील पराभवानंतर अन्वीने सलग चार विजय मिळवत दमदार पुनरागमन केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 12, 2026 | 09:45 PM
Russia Chess Competition

Russia Chess Competition

Follow Us
Follow Us:
  • रशियात अन्वी हिंगेची सुवर्णभरारी,ब्लिट्झमध्ये अव्वल, स्टँडर्डमध्ये रौप्य
  • आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत दुहेरी पदकांची कमाई
  • आंतरराष्ट्रीय पदकांची संख्या १५ वर
पिंपरी/Chess Tournament: रशियातील तुला येथे झालेल्या विसाव्या आशियाई शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या अन्वी दीपक हिंगे हिने भारताची मान उंचावली. मुलींच्या नऊ वर्षांखालील गटात ब्लिट्झ प्रकारात सुवर्ण, तर स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदक पटकावत तिने दुहेरी यश संपादन केले. या कामगिरीमुळे तिच्या आंतरराष्ट्रीय पदकांची संख्या १५ झाली आहे. १ ते ११ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत १२ देशांतील ३१८ खेळाडूंनी सहभाग घेतला.

बुद्धिबळासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियात अन्वीने आपल्या खेळाची छाप पाडली. ती चिंचवड येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथ्या इयत्तेत शिकत असून, तिला ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित आणि मानसिक प्रशिक्षण मार्गदर्शक ऋतू बळ्यान चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ब्लिट्झ प्रकारातील नऊ फेऱ्यांमध्ये अन्वीने आठ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. आठ विजय आणि एका पराभवासह तिने सुवर्णपदकावर नाव कोरले.

तुर्कमेनिस्तानच्या बागुल जुमायेवा हिला साडेसात गुणांसह रौप्य, तर रशियाच्या लेयला इसायेवा हिला सहा गुणांसह कांस्यपदक मिळाले. पाचव्या फेरीतील पराभवानंतर अन्वीने सलग चार विजय मिळवत दमदार पुनरागमन केले. प्रतिस्पर्ध्यांच्या डावपेचांना चपळाईने प्रत्युत्तर देत तिने दबावाखालीही एकाग्रता कायम राखली. या कामगिरीमुळे तिच्या फिडे ब्लिट्झ मानांकनात ५८ गुणांची वाढ झाली.

कुठं बी जा, भारताचा नाद करायचा नाय! क्रिशव शाहची मलेशियात उत्तुंग भरारी, Chess स्पर्धेत…

स्टँडर्ड प्रकारातही पदक

स्टँडर्ड प्रकारात अन्वीने नऊ फेऱ्यांत साडेसहा गुण मिळवत रौप्यपदक पटकावले. कझाकस्तानच्या अमालिया येद्रेसहेवा हिने आठ गुणांसह सुवर्ण, तर रशियाच्या मिया कुद्र्याशोवा हिने सहा गुणांसह कांस्यपदक जिंकले. वेगवान ब्लिट्झ आणि दीर्घ विचाराला वाव देणाऱ्या स्टँडर्ड या दोन्ही प्रकारांत पदक मिळवून अन्वीने आपल्या खेळातील अष्टपैलुत्व सिद्ध केले. अन्वीला यापूर्वीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळाले आहे. वयाच्या आठ वर्षे अकरा महिन्यांत तिने वुमन कॅन्डिडेट मास्टर हा फिडेचा किताब मिळवला. २०२५ मध्ये ग्रीसमधील जागतिक कॅडेट व युवा जलदगती आणि ब्लिट्झ स्पर्धेत तिने उपविजेतेपद पटकावले होते. ताजिकिस्तानमधील दुशान्बे येथील पश्चिम आशिया युवा स्पर्धेतही तिने वैयक्तिक व सांघिक प्रकारांत सहा पदके जिंकली आहेत.

प्रशिक्षक, कुटुंब आणि प्रायोजकांचे पाठबळ

अन्वीच्या कामगिरीचे कौतुक करताना आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित यांनी तिची वेगवान निर्णयक्षमता, एकाग्रता आणि पराभवानंतर पुनरागमन करण्याची वृत्ती उल्लेखनीय असल्याचे सांगितले. सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ती भविष्यात मोठ्या स्पर्धांमध्येही यश मिळवू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Chess च्या विश्वात भारताचा तिरंगा उंचावला! सलग तिसऱ्यांदा पटकावला मानाचा करंडक, उझबेकिस्तानमध्ये…

अन्वीचे वडील दीपक हिंगे यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. मुलीच्या मेहनतीला कुटुंबाचा पाठिंबा असून, तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासात मोरडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि लक्ष्य स्पोर्ट्स यांचे सहकार्य मोलाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतासाठी दोन पदके जिंकल्याचा आनंद व्यक्त करत अन्वीने भविष्यात मानांकन वाढवून जागतिक स्तरावरील मोठी विजेतेपदे मिळवण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. तुला येथील दुहेरी यशामुळे या युवा बुद्धिबळपटूने भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात आपली चमक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

Web Title: Pcmc anvi hinge wins gold and bronze medal asian chess competition in russia sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Chess Championship
  • Pimpri
  • Russia
  • Sports News

संबंधित बातम्या

कुठं बी जा, भारताचा नाद करायचा नाय! क्रिशव शाहची मलेशियात उत्तुंग भरारी, Chess स्पर्धेत…
1

कुठं बी जा, भारताचा नाद करायचा नाय! क्रिशव शाहची मलेशियात उत्तुंग भरारी, Chess स्पर्धेत…

US Russia Oil Deal वरून वॉशिंग्टनमध्ये राजकीय वादळ; सिनेटर्समध्ये मोठी फूट, 18 ऑक्टोबरच्या निर्णयाकडे भारतासह जगाचे लक्ष
2

US Russia Oil Deal वरून वॉशिंग्टनमध्ये राजकीय वादळ; सिनेटर्समध्ये मोठी फूट, 18 ऑक्टोबरच्या निर्णयाकडे भारतासह जगाचे लक्ष

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?
3

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क
4

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.