
Russia attack on Ukraine
Ukraine Peace Plan नाकारताच संतापले ट्रम्प; दिला अल्टीमेटम, आता काय करणार झेलेन्स्की?
कीवच्या महापौर आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने कीवमधील पेचेर्स्क जिल्ह्यात एका रहिवाशी इमारतीवर हल्ला केला आहे. तर पूर्वेकडील भागात दुसरी, डनिप्रोव्स्की मध्ये देखील ड्रोन्सचा वर्षावर करण्यात आला आहे. सध्या रशियाच्या सततच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेनबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे हल्ले युक्रेनने केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात करण्यात आले आहेत. युक्रेनने रशियन प्रदेशांवर हल्ला केला होता. पण रशियाने सर्व हल्ले हाणून पाडले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि तुर्कीच्या मध्यस्थीने रशिया युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी २८ कलमी योजना देखील आखली होती. ज्याला रशियाकडून तर मान्यता मिळाली, पण युक्रेनने नकार दिला. कारण यामध्ये युक्रेनसाठी मर्यादित सुरक्षा हमी आणि रशियाच्या दीर्घकालीन मागण्यांचा समावेश आहे. ज्या मान्य करत पुतिन यांनी अंतिम करारावर चर्चा करण्यास सहमती दिली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरुच आहे, मात्र दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत.
ट्रम्प यांच्या योजनेत युक्रेनला रशियाला त्यांचा काही भूभाग सोपवावा लागेल. तसेच युक्रेनला त्यांची सैन्य संख्या कमी करावी लागेल आणि नाटो देशाच्या सदस्यत्व देखील युक्रेनला दिले जाणार नाही. यामुळे झेलेन्स्की यांनी हा प्रस्ताव पूर्णपणे रशियाच्या बाजूने आणि मॉस्कोच्या हिताचा असल्याचे म्हटले आहे. यामुळे युक्रेनचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी झेलेन्स्की यांनी याला नकार दिला आहे.