रशिया -युक्रेन युद्धात AI हल्ला; चक्क AI Girlfriend बनवून मिलिटरी ऑफिसरला केले हनी ट्रॅप; असा उघड झाला संपूर्ण खेळ? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) या AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. युक्रेनने हनी ट्रप करण्यासाठी चक्क AI गर्लफ्रेंड बनवली. याच्या मदतीने रशियाच्या एका मिलिटरी अधिकाऱ्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु युक्रेनचा प्रयत्न पूर्णपण फसला. रशियन अधिकाऱ्याला या गर्लफ्रेंडच्या मदतीने विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण अधिकाऱ्याच्या सावधगिरीमुळे त्याचे प्राण वाचले. या प्रकरण नक्की काय आहे हे आपण आज समजून घेऊयात.
मीडिया रिपोर्टनुसार, युक्रेनने रशियाच्या अधिकाऱ्याला हनी ट्रॅप करुन मारण्याचा प्लॅन आखला होता. युक्रेनच्या SBU या गुप्तचर संघटनेने ही योजना आखली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने पॉलिना नावाची एक व्हर्च्युअल तरुणी तयार केली होती. ही तरुणी एका डेटिंग अपवरुन रशियन अधिकाऱ्याशी चॅट करत. त्याला स्वत:चे फोटो, व्हिडिओ पाठवत. हे एआय फोटो पण जवळजवळ खरेच भासत होते. अनेक महिने या पोलिना आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये बोलणे सुरु होते. ऑफिसर या AI गर्लफ्रेंडच्या प्रेमात वेडा झाला होता. जेव्हा याची खात्री पोलिनाला पटली तेव्हा भेटवस्तू पाठवण्याचे ठरवले. पण इथेच सगळा खेळ उघड झाला.
जेव्हा या पोलिना नावाच्या (AI) मुलीने रशियन अधिकाऱ्याला गिफ्ट पाठवण्याचे ठरवले, त्यावेळी हा खेळ उघड झाला. पण जेव्हा या बियरच्या बाटल्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्या तेव्हा रशियाच्या गुप्तचर संस्था FSB ला संशय आला. FSB ला तपासात आढळले की, भेट देण्यासाठी डोनेस्टकच्या एका रहिवाशाला पैशाचे अमिष दाखवण्यात आले होते. त्याला ब्रिटिश बिअरच्या दोन पॅकेट्स रशियन अधिकार्यापर्यंत पोहचवायचे होते. यासाठी त्याला ५००० डॉलर्स देण्यात आले होते.
जर रशियन अधिकाऱ्याने त्या बिअर पिल्या असत्या तर त्याचा सेवनाने जागीच अधिकाऱ्याचा वेदनादायी मृत्यू झाला असता. परंतु FSB च्या सतर्कतेमुळ अधिकाऱ्याचा जीव वाचला. FSB ने प्रकरणाची छानबीन केली असून त्यांना तपासात आढळून आले की, पोलिना नावाची कोणतीही खरी-खुरी मुलगी नव्हे, तर एक व्हर्च्युअल प्रतिबिंब आहे. तिला युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने तयार केले होते. तसेच तिने रशियन अधिकाऱ्याला पाठवलेले फोटो, व्हिडिओ देखील AI च्या मदतीने बनवण्यात आले होते. याचा उद्देश रशियन अधिकाऱ्याला मारण्याचा होता. सध्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.






