Ukraine Peace Plan नाकारताच संतापले ट्रम्प; दिला अल्टीमेटम, आता काय करणार झेलेन्स्की? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia-Ukraine Peace Plan : मॉस्को/कीव : रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ला करत आहे. या युद्धात युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक लोकांचा यामध्ये बळी गेला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. नुकतेच ट्रम्प यांनी देखील यासाठी एक योजना आखली आहे. ज्याला रशियाकडून तर मान्यता मिळाली आहे, पण युक्रेनने नकार दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी २८ कलमी योजना आखली असल्याचे वृत्त समोर आली आहे. पण या योजनेला युक्रेनने नकार दिला आहे. यामुळे ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर रशियाने या योजनेचे स्वागत केले असल्याचे सांगितले जात आहे.
शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) या योजनेबाबत झेलेन्स्की यांनी आपल्या नागरिकांना संबोधित करत म्हटले की, आपल्या देशाच्या सार्वभौमत्वासाठी एकत्र उभे राहावे लागले. हा प्रस्ताव पूर्णपणे रशियाच्या बाजूने असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी म्हटले आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी अमेरिकेच्या प्रस्ताव मान्य केला आहे. यामध्ये युक्रेनसाठी मर्यादित सुरक्षा हमी आणि रशियाच्या दीर्घकालीन मागण्यांचा समावेश आहे. ज्या मान्य करत पुतिन यांनी अंतिम करारावर चर्चा करण्यास सहमती दिली आहे.
ट्रम्प यांच्या या २८ कलमी योजनेअंतर्गत युक्रेनला रशियाला त्यांचा काही भूभाग सोपवावा लागणार आहे. मात्र याला झेलेन्स्कींनी नकार दिला आहे. तसेच या करारनुसार युक्रेनला त्यांची सैन्य संख्या कमी करावी लागणार आहे. नाटो देशाच्या सदस्यत्व देखील युक्रेनला दिले जाणार नाही असे या करारात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान झेलेन्स्की यांनी हा प्रस्ताव पूर्णपणे रशियाच्या बाजूने आणि मॉस्कोच्या हिताचा असल्याचे म्हटले आहे. यामुळे युक्रेनचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी झेलेन्स्की यांनी याला नकार दिला आहे.
झेलेन्स्की यांनी प्रस्ताव नाकरल्याने ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना गुरुवारपर्यंत प्रस्ताव स्वीकरण्याचा अल्टीमेट्म दिला आहे. जर युक्रेनने त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही, तर हे युद्ध असेच सुरु राहिले असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
सध्या ट्रम्प यांच्या या अल्टीमेट्ममुळे झेलेन्स्कींची चिंता वाढली आहे. परंतु त्यांनी प्रस्तावातील अटी एकतर्फी असल्याने देशाच्या सुरक्षेसाठी आणि सर्वभौमत्वासाठी त्या मान्य करण्यास नकार दिला आहे. सध्या झेलेन्स्की जर्मनी, फ्रान्स, ब्रिटव या देशांच्या नेत्यांशी चर्चा करत आहे. या देशांनी सुरुवातीपासूनच युक्रेनला पाठिंबा दिला आहे. सध्या या देशांच्याच समर्थनावर युक्रेनची सुरक्षा अवलंबून आहे. झेलेन्स्की काही दिवसांत यावर ट्रम्प यांची भेट घेणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. आता ट्रम्प यांची योजना यशस्वी होते का युद्ध असेच सुरु राहिल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये ‘हिरो पिग’ने वाचवले रशियन सैनिकांचे प्राण; अविश्वसनीय घटना VIRAL






