
Russia attack with drones, missiles pound on Ukraine ahead of Zelensky-Trump meeting
रशियाचा युक्रेनमध्ये कहर ! एका आठवड्यात तब्बल ‘इतक्या’ ड्रोन अन् बॉम्बसचा मारा; झेलेन्स्की संतप्त
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रशिया सतत युक्रेनवर हल्ला करत आहे. नुकत्याच केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या आणखी काही पायाभूक सुविधा नष्ट झाल्या असून सर्वत्र अंधार पसरलेला आहे. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला, जेव्हा युक्रेनने ६० दिवसांच्या युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली होती. मात्र रशियाच्या या हल्ल्यामुळे युद्धबंदीला मोठा धक्का पोहोचला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, अमेरिका-युक्रेन शांती कराराचा प्रस्तावर तयार असून सुरक्षा हमीबाबतचा मुद्दाही अंतिम टप्प्यात आहे. परंतु रशियाच्या सततच्या हल्ल्यांवरुन त्यांना युद्ध थांबावयचे नसल्याचे स्पष्ट होते, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले.
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेन शांती प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी झेलेन्स्की फ्लोरिडातील मार-ए-लागो क्लबमध्ये ट्रम्प यांची रविवारी (२८ डिसेंबर) भेट घेणार आहेत. मात्र या भेटीपूर्वी हल्ला झाल्याने युद्धविराम, प्रादेशिक शांतात आणि भविष्यातील चर्चांना धक्का बसला आहे.
याच वेळी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात आठ जण जखमी झाल्याते आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. कीवसह अनेक प्रदेशांवर हे हल्ले करण्यात आले असून निवासी इमारतींना आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असल्याचे युक्रेन प्रशासनाने म्हटले आहे.
🚨🇺🇦🇷🇺 BREAKING: RUSSIA LAUNCHES MASSIVE MISSILE STRIKE ON KYIV HOURS AFTER ZELENSKY SAID HE’S READY TO HOLD REFERENDUM ON TRUMP’S PEACE PLAN The Ukrainian capital came under massive attack early Saturday, with air defenses in operation and large-scale power outages hitting the… pic.twitter.com/SNb68IIN5W — Mario Nawfal (@MarioNawfal) December 27, 2025
तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी झालेल्या हल्ला हा युक्रेनवर रशियाच्या दबावाची चाल आहे. युद्धविरामाच्या अटींबाबत युक्रेनने मान्यता द्यावी यासाठी रशिया शक्तीप्रदर्शन करत आहे. सध्या यामुळे युद्ध अधिक तीव्र आणि हिंसक होण्याची शक्यता आहे.