युक्रेनने रशियावर मोठा प्रत्युत्तर हल्ला केला, ब्रिटीश स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्राने पुतिनची तेल शुद्धीकरण कारखाना उद्ध्वस्त केला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Ukraine Storm Shadow missile attack Russia 2025 : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध आता एका अत्यंत विनाशकारी आणि निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर युक्रेनने रशियाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. ब्रिटनने पुरवलेल्या अत्याधुनिक आणि प्राणघातक ‘स्टॉर्म शॅडो’ (Storm Shadow) क्षेपणास्त्रांच्या मदतीने युक्रेनने रशियाच्या सीमेत खोलवर शिरून एका मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर (Oil Refinery) यशस्वी हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे रशियन सैन्याची इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली असून पुतिन यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
युक्रेनियन हवाई दलाने २५ डिसेंबर रोजी रशियाच्या रोस्तोव्ह प्रदेशातील नोवोशाख्तिन्स्क येथील ऑईल रिफायनरीला आपले लक्ष्य बनवले. युक्रेनियन जनरल स्टाफच्या माहितीनुसार, स्टॉर्म शॅडो क्रूझ क्षेपणास्त्रांनी या प्लांटवर इतका अचूक मारा केला की, तिथे एकापाठोपाठ एक अनेक भीषण स्फोट झाले. हल्ल्याची तीव्रता इतकी मोठी होती की, रिफायनरीमधून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट कित्येक किलोमीटर अंतरावरून स्पष्ट दिसत होते. ही रिफायनरी दक्षिण रशियातील पेट्रोलियम उत्पादनांचा सर्वात मोठा स्रोत मानली जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maulana Shamsul Huda: ईडीने ब्रिटनमधील धर्मगुरूविरुद्ध दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा; कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी सुरू
युक्रेनने हा हल्ला अत्यंत विचारपूर्वक केला आहे. नोवोशाख्तिन्स्क रिफायनरी ही केवळ व्यावसायिक केंद्र नव्हती, तर ती रशियन सशस्त्र दलांची ‘लाईफलाईन’ होती. येथूनच रशियन लढाऊ विमानांसाठी लागणारे रॉकेट इंधन आणि रणगाड्यांसाठी लागणारे डिझेल मोठ्या प्रमाणात पुरवले जात असे. या प्लांटवर हल्ला करून युक्रेनने पुतिन यांच्या युद्धयंत्रणेचा वेग मंदावण्याचा प्रयत्न केला आहे. इंधन नसेल तर रशियन रणगाडे आणि विमाने जागची हलणेही कठीण होणार आहे, ज्याचा थेट फायदा युक्रेनला युद्धभूमीवर मिळेल.
BREAKING: Ukraine struck Russia’s Novoshakhtinsk oil refinery with British Storm Shadow missiles, triggering multiple explosions. pic.twitter.com/w79gaesqea — Republicans against Trump (@RpsAgainstTrump) December 25, 2025
credit : social media and Twitter
या मोहिमेत वापरलेले ब्रिटीश स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्र हे त्याच्या अचूकतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हे क्षेपणास्त्र २५० किलोमीटरहून अधिक पल्ल्यापर्यंत जाऊन शत्रूचा नाश करू शकते. सुमारे १,३०० किलोग्रॅम वजनाचे हे क्षेपणास्त्र रडारच्या नजरेत न येता (Stealth) हल्ला करण्यास सक्षम आहे. ४५० किलोच्या वॉरहेडमुळे हे क्षेपणास्त्र सिमेंटच्या मजबूत भिंती किंवा मोठ्या रिफायनरीसारख्या वास्तूंना क्षणात जमीनदोस्त करू शकते. रशियाच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालींना (Air Defense) चकवून केलेल्या या हल्ल्याने रशियन लष्करी तज्ज्ञांची झोप उडवली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chinese Weapons : ड्रॅगनचा बनावट माल उघड? कंबोडियातील दुर्घटनेनंतर चिनी शस्त्रांच्या गुणवत्तेवर जगभरातून टीका
गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया युक्रेनच्या शहरांवर आणि ऊर्जा केंद्रांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत होता. मात्र, आता युक्रेनने आपली रणनीती बदलली आहे. युक्रेन आता रशियाच्या आर्थिक शक्तीवर थेट प्रहार करत आहे. इंधन साठे आणि रिफायनरी नष्ट केल्यामुळे रशियाला केवळ लष्करीच नाही तर आर्थिक नुकसानही सहन करावे लागणार आहे. युक्रेनच्या या धाडसी पवित्र्यामुळे येत्या काळात हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, रशिया यावर काय प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Ans: युक्रेनने रशियाच्या रोस्तोव्ह प्रदेशातील नोवोशाख्तिन्स्क (Novoshakhtinsk) या महत्त्वपूर्ण तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला.
Ans: या हल्ल्यासाठी ब्रिटनने पुरवलेल्या 'स्टॉर्म शॅडो' (Storm Shadow) या लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला.
Ans: या हल्ल्यामुळे रशियन लष्कराला होणारा डिझेल आणि लढाऊ विमानांच्या इंधनाचा पुरवठा खंडित झाला असून रशियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.






